agriculture news in marathi, Citrus crop faces heatwave in Jalgaon district | Agrowon

उन्हाचा पश्‍चिम भागातील लिंबू बागांना फटका
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 मे 2018

जळगाव : पारोळा, भडगाव व परिसरांत वाढत्या उन्हाचा लिंबू बागांना फटका बसला आहे. या बागा वाचविण्यासाठी शेतकरी धावपळ करीत आहेत. सुमारे ४५० एकरांवरील बागा करपल्या आहेत. याबाबत कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज आहे. 

जळगाव : पारोळा, भडगाव व परिसरांत वाढत्या उन्हाचा लिंबू बागांना फटका बसला आहे. या बागा वाचविण्यासाठी शेतकरी धावपळ करीत आहेत. सुमारे ४५० एकरांवरील बागा करपल्या आहेत. याबाबत कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज आहे. 

तामसवाडी, टोळी, तरडी, बोळे, सावखेडा, करमाड, सावरखेडा, कराडी भागांतील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लिंबू लागवड केली आहे. मात्र, पुरेसा पाऊस न झाल्याने विहिरींनी दिवाळीपासून तळ गाठला आहे. बहुतांशी विहिरी आटू लागल्या असून, बागेला वाचवायचे कसे, असा प्रश्‍न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. काही मोठे व श्रीमंत शेतकरी टॅंकरने पाणी आणून बाग वाचविण्याची धडपड करीत आहेत. मात्र, वाढत्या उन्हाने व तीव्र पाणीटंचाईने लिंबूची वाढ खुंटली आहे. यामुळे छोटे फळ परिपक्व व मोठ्या होण्याच्या प्रमाणात घट झाली आहे. शेतकऱ्यांना नाइलाजास्तव छोटे लिंबू बाजारात विक्रीसाठी न्यावे लागत आहेत. पण त्यांना भाव नाही. परिणामी, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. 

पारोळा, भडगाव तालुक्‍यांतील लिंबूची पाठवणूक मुंबई, ठाण्यातही होते. तसेच अनेकजण जळगाव, धुळ्यातील बाजार समितीत लिंबू विक्रीसाठी आणतात. परंतु सध्या ऊन आणि कमी पाणी यामुळे बागांचे सिंचन करणे शक्‍य होत नसल्याचे चित्र आहे. परिणामी, लहान बागा वाळू लागल्या आहेत. लाखो रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे. 

आमच्या भागातील लिंबू बागांना उन्हाचा फटका बसला असून, उष्णता दिवसागणिक वाढतच आहे. भडगाव तालुक्‍यात गिरणा काठावरील गावांमध्ये स्थिती बरी आहे. परंतु गुढे व खेडगावच्या पूर्व भागात हवे तसे पाणी नाही. यामुळे नुकसान होत आहे. 
- राकेश मराठे, शेतकरी, भडगाव

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...