agriculture news in marathi, The claim for Indemnification is not based on facts | Agrowon

नुकसानभरपाईची मागणी तथ्यांवर आधारित नाहीच
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 जानेवारी 2018

नागपूर : नॅशनल सीड असोसिएशनने बोंड अळीला मोन्सॅटोचे तंत्रज्ञानातील अपयश कारणीभूत असल्याचा आरोप करत या संदर्भातील नुकसानभरपाई केवळ महिको मोन्सॅटोने द्यावी, अशी मागणी केली होती; परंतु ही मागणी तथ्थ्यांवर आधारित नसल्याचा दावा महिको-मोन्सॅटोने नॅशनल सीड असोसिएशनला लिहिलेल्या पत्रात केला आहे. तसेच या माध्यमातून भारतीय शेतकऱ्यांचे हित जपण्याऐवजी आर्थिक लाभासाठी काम करणाऱ्या काही बियाणे कंपन्यांचेच चांगभले होत असल्याचेही पत्रात म्हटले आहे.

नागपूर : नॅशनल सीड असोसिएशनने बोंड अळीला मोन्सॅटोचे तंत्रज्ञानातील अपयश कारणीभूत असल्याचा आरोप करत या संदर्भातील नुकसानभरपाई केवळ महिको मोन्सॅटोने द्यावी, अशी मागणी केली होती; परंतु ही मागणी तथ्थ्यांवर आधारित नसल्याचा दावा महिको-मोन्सॅटोने नॅशनल सीड असोसिएशनला लिहिलेल्या पत्रात केला आहे. तसेच या माध्यमातून भारतीय शेतकऱ्यांचे हित जपण्याऐवजी आर्थिक लाभासाठी काम करणाऱ्या काही बियाणे कंपन्यांचेच चांगभले होत असल्याचेही पत्रात म्हटले आहे.

मोन्सॅटोकडून नॅशनल सीड असोसिएशनला दिलेल्या पत्रात म्हटले, की बियाणे कंपन्या आणि महिको मोन्सॅटो यांच्यात द्विपक्षीय तंत्रज्ञान करार झाला आहे. त्यामुळे बियाणे कंपन्यांना एखाद्या मुद्यावर अडचण गेल्यास त्यांच्याकडून थेट महिको मोन्सॅटोला पत्रव्यवहार होणे अपेक्षित आहे. बोंड अळी नुकसानप्रकरणी नॅशनल सीड असोसिएशनकडून होणारा पत्रव्यवहार किंवा हस्तक्षेप हा चुकीचा आणि न्यायिकदृष्ट्या योग्य नाही.

बोलगार्ड तंत्रज्ञान आजही प्राथमिक किडींना प्रतिकारक असल्याने तंत्रज्ञान शुल्कात बियाणे कंपन्यांचा वाटा असावा ही बाबदेखील आम्हाला मान्य नाही, असेही पत्रात म्हटले आहे. बोलगार्ड तंत्रज्ञानात मोन्सॅटोचा एकाधिकार होता, त्यामुळे त्यांनी वाटेल तसे करार करून घेतले, हा नॅशनल सीड असोसिएशनचा दावादेखील चुकीचा आहे, असेही मोन्सॅटोचे म्हणणे आहे. नियंत्रण समितीने सहा बायोटेक्‍नालॉजी तंत्रज्ञान शिफारसीत केले आहेत.

२०१५ मध्येच दिली बोंड अळीची सूचना
अानुवांशिक अभियांत्रिकी मूल्यांकन समिती (जीईएसी) व्दारा २०१५ मध्येच बीजी-२ तंत्रज्ञानावर बोंड अळीचा प्रादुर्भाव नुकसान पातळीच्यावर पोचल्याचे निरीक्षणाअंती कळविण्यात आले होते. एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अभाव व नॉन बिटी बियाण्यांची लागवड न करणे यामुळे हे घडल्याचे जीईएसीचे म्हणणे होते. बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी होण्याच्या दृष्टीने त्या वेळी महिको मोन्सॅटोकडून राबविण्यात आलेल्या उपाया संदर्भाने त्या वेळी जीईएसीला कळविण्यात आल्याचे पत्रात म्हटले आहे. या संदर्भाने बियाणे कंपन्यांना फेब्रुवारी २०१६ आणि मार्च २०१७ मध्ये माहिती देत शिफारसीत उपाययोजनांवर भर देण्यास सांगण्यात आले. रिफ्युजी ईन बिटी या संकल्पनेवरदेखील मोन्सॅटोने काम केले आहे. राज्यातील विद्यापीठ आणि केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या अहवालावर आधारित तशाप्रकारची शिफारस करून ६०० प्रात्याक्षिकदेखील देशभरात घेण्यात आली.

बिटी बियाणे न विकणे शेतकरीविरोधी
नॅशनल सीड असोसिएशनने त्यांच्या सदस्यांना येत्या हंगामात बिटी बियाणे न विकण्याचा सल्ला दिला आहे. हा प्रकार शेतकरीविरोधी असून बियाणे कंपन्यांनी नॅशनल सीड असोसिएशनचे हे धोरण पूर्णपणे फेटाळले पाहिजे. अशा धोरणाचा विरोध करण्याकरिता महिको-मोन्सॅटोसोबत एकत्रितपणे बियाणे कंपन्यांनी काम करण्याची गरजही पत्रातून मांडली गेली आहे.

इतर ताज्या घडामोडी
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला चैत्री...सोलापूर : गेल्या आठवड्यात झालेल्या चैत्री...
अकोला जगात ‘हॉट’ शहरांच्या यादीतअकोला : मागील दोन दिवसांपासून या भागात उष्णतेचे...
दुष्काळी भागात दाहकता वाढलीसावळज, जि. सांगली : कायमस्वरूपी दुष्काळी भाग...
विकासासाठी पुन्हा एकदा संधी द्या :...नाशिक : लोकसभेची ही निवडणूक विकासाची, सामान्य...
राहुल गांधी यांची आज संगमनेरात सभानगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काॅँग्रेसचे...
तयार करा सेंद्रिय निविष्ठाअलीकडे सेंद्रिय शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची...
रताळे लागवडरताळी लागवडीसाठी जमीन साधारण उतार असलेली व उत्तम...
निवडणूक संपली, आता तरी दुष्काळी...सांगली ः लोकसभेची आचारसंहिता एक महिन्यापासून सुरू...
चौथ्या टप्प्यात १०९ कोट्यधीश उमेदवार...मुंबई ः राज्यातील चौथ्या टप्प्याची निवडणूक...
पुणे ः खरिपासाठी एक लाख ८५ हजार टन...पुणे ः पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू...
राज्यात कलिंगड प्रतिक्विंटल ५०० ते २१००...अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते ११०० रुपये अकोला ः...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...