agriculture news in marathi, clean india campaign, jalgaon | Agrowon

जळगाव जिल्ह्यातील ४१८ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त
चंद्रकांत जाधव
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017
हागणदारीमुक्तीसंबंधी जिल्ह्यात गतीने काम सुरू आहे. या महिन्यात कामे पुन्हा सुरू होतील. यासोबत जेथे शौचालयांच्या वापराबाबत ग्रामस्थांमध्ये अनास्था आहे तेथे जनजागृतीचे काम हाती घेण्यात आले आहे. 
- राजन पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद, जळगाव
जळगाव : जिल्ह्यातील ११५१ पैकी फक्त ४१८ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. तब्बल ७३३ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झालेल्या नाहीत. यातच मार्च २०१८ पर्यंत सर्व ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेने निश्‍चित केलेले आहे, पण कामांची गती संथ राहिली तर हे उद्दिष्ट पूर्ण होणार कसे, हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 
 
हागणदारीमुक्तीसाठी वैयक्तिक शौचालये बांधकामाचे काम हाती घेण्यात आले असून, १२ हजार रुपये अनुदान प्रतिशौचालय बांधणीसाठी दिले जात आहे. ग्रामस्थ शौचालये तयार करून घेत आहेत, परंतु अनुदान नसल्याने यासंदर्भातील कामे जळगाव, अमळनेर, पाचोरा येथे रखडली आहेत. याकरिता आणखी सहा कोटी रुपयांच्या अनुदानाची गरज असल्याची माहिती जिल्हा परिषदेतून मिळाली. सध्या पावसाळ्याचे कारण सांगून कामे ग्रामस्थांनी बंद ठेवली आहेत, पण दिवाळीनंतर कामांना गती येईल, असे जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 
 
जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार हागणदारीमुक्तीचे काम ३६ टक्के झाले आहे. त्यातच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात किंवा तालुक्‍यात १०८ पैकी १८ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या असून, ८९ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात कामे अपूर्ण आहेत. अशीच स्थिती सहकार राज्यमंत्री यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघाची आहे.
 
या तालुक्‍यात ७० ग्रामपंचायती आहेत. पैकी २७ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. भुसावळ तालुका हागणदारीमुक्त घोषित झाला आहे. परंतु या तालुक्‍यातील गोजोरे, कुऱ्हेपानाचे, वराडसीम आदी गावांच्या क्षेत्रात हागणदारीमुक्तीबाबची कामे अपूर्ण असून, हा तालुका कागदोपत्री हागणदारीमुक्त दाखविला आहे. 
 
जिल्ह्यात १५ तालुक्‍यांतर्गत असलेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात चार लाख ९१ हजार ३०१ कुटुंबे आहेत. दोन लाख ८९ हजार ५४९ कुटुंबांकडे शौचालये आहेत. दोन लाख एक हजार ७५२ कुटुंबांकडे अद्याप शौचालये नसल्याची माहिती समोर आली आहे. 
 

इतर ताज्या घडामोडी
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...
नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...
सांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...
केंद्र आणि राज्याच्या मंत्र्यांना कांदे...नाशिक  : अगोदरच मागील कांदा विक्रीचे अनुदान...
सहलींच्या बचत निधीतून होणार आंबा फवारणी...रत्नागिरी : ग्रास कटर, आंबा फवारणी मशिनला...
मराठवाड्यात चार दिवसांत लाखभर लोक...औरंगाबाद : लांबलेला पाऊस, भूपृष्ठावरील जलसाठ्यांत...
पणन सुधारणा विधेयक पावसाळी अधिवेशनात...पुणे  ः शेतीमाल पणन सुधारणांमधील...
पुणे बाजार समिती पुनर्विकासाला गतीपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांना ‘सहवीज’मधून १०४१ कोटींचे...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी सहवीज...
खानदेशात उष्णतेचा कहर; पावसाची...जळगाव  ः खानदेशात वादळी पाऊस वगळता कुठेही...
शकूबाईंच्या लढ्याला आले यश;  वनजमीन...वणी, जि. नाशिक  : शेतकरी व आदिवासींच्या...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद  ः दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...
उन्नत शेती अभियानात १५ दिवसांत १९ लाख...मुंबई : राज्यात उन्नत शेती - समृद्ध शेतकरी...
पाणी जिरविण्यासाठी नदीपात्र नांगरण्याचा...अमरावती  ः भूगर्भात पाणी मुरून पातळी वाढावी...
काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी...मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने...
राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार मुंबई : होणार होणार म्हणून गेले काही...
मोठ्या गटांसाठी व्यवस्थापन समितीची...शेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने...
पीकविमा न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत...मुंबई : राज्यातील अनेक शेतकऱ्यांना...