agriculture news in marathi, Cleanliness survey on Nashik front | Agrowon

स्वच्छता सर्वेक्षणात नाशिक आघाडीवर
टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

नाशिक  : केंद्र सरकारच्या स्वच्छता मोहिमेंतर्गत ग्रामीण भागात १ आॅगस्टपासून स्वच्छता उपक्रमास सुरवात झाली असून, या मोहिमेत थेट नागरिकांचा सहभाग मिळविण्यात नाशिक जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक राखला आहे. सुमारे ५६ हजार ग्रामस्थांनी अ‍ॅपच्या माध्यमातून गावातील स्वच्छतेबाबतचे अभिप्राय नोंदविले आहेत. राज्यात नाशिक जिल्हा अभिप्राय नोंदणीत आघाडीवर आहे.

नाशिक  : केंद्र सरकारच्या स्वच्छता मोहिमेंतर्गत ग्रामीण भागात १ आॅगस्टपासून स्वच्छता उपक्रमास सुरवात झाली असून, या मोहिमेत थेट नागरिकांचा सहभाग मिळविण्यात नाशिक जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक राखला आहे. सुमारे ५६ हजार ग्रामस्थांनी अ‍ॅपच्या माध्यमातून गावातील स्वच्छतेबाबतचे अभिप्राय नोंदविले आहेत. राज्यात नाशिक जिल्हा अभिप्राय नोंदणीत आघाडीवर आहे.

केंद्राकडून आता ग्रामीण भागात स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. यासाठी १ आॅगस्टपासून गावागावांमध्ये व्यापक स्वच्छता आणि जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यातील १३६८ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील गावागावांमध्ये स्वच्छता मिशन व्यापक करण्यात आले आहे. या मोहिमेत शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, धार्मिक स्थळे, आठवडे बाजार, ग्रामपंचायत कार्यालयांबरोबरच गावातील रस्ते, पाणीपुरवठा आणि आरोग्यबाबतही सुधारणा केली जात आहे. ठिकठिकाणी जाऊन जिल्हा परिषदेचे अधिकारी आढावा घेत आहेत. जिल्हा परिषदेचे सर्वच विभाग कामाला लागले आहेत.

गावागावांतील स्वच्छतेच्या कामात जनतेचा थेट सहभाग असावा, यासाठी ‘एसएसजी-१८’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्रामस्थ आपल्या गावाविषयीच्या स्वच्छता कामांचे अभिप्राय नोंदवित आहेत. यामध्ये रविवारपर्यंत नाशिक जिल्ह्णातील सुमारे ५६,२५२ नागरिकांनी स्वच्छतेविषयची अभिप्राय नोंदविले आहेत. येत्या आठवडाभरात केंद्राची समिती जिल्ह्णातील स्वच्छ गावांचा दौरा करण्याची शक्यता आहे़

चार प्रश्नांचा अभिप्राय
ग्रामीण भागात १ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत स्वच्छ भारत मिशन सर्वेक्षण उपक्रम राबविला जात आहे. ग्रामस्थ गावागावांत स्वच्छतेविषयीचे काम कसे झाले, याचा अभिप्राय या माध्यमातून नोंदवून कामातील वास्तविकता दर्शवू शकणार आहेत. अ‍ॅपमध्ये ग्रामस्थांना चार प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरे त्यांनी अभिप्राय म्हणून द्यायची आहेत.

इतर ताज्या घडामोडी
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...
नगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...
तासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली  ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...
विसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद   : येथे रविवारी (ता....
वऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला  ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर  ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर  : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...
पीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा   ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...
इंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे  : सरकारने आता तांत्रिक...
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...
शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामेकऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला...
हापूसचा ‘अल्फोन्सो जीआय’ वादातपुणे   : केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘...
साखर निर्यातीसाठी कारखान्यांनी पुढे...मुंबई   : अडचणीतील साखर उद्योगाला...
दक्षिण कोकणात बुधवारपासून शक्यतापुणे  : कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी...
पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर...गुडगाव : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी...
शबरीमला मंदिर प्रवेशप्रकरणी केरळमध्ये...तिरुअनंतपुरम, केरळ : शबरीमला मंदिरात सर्व...