शेतकऱ्याकडून लाच घेणाऱ्या लेखापाल, प्रतवारीकारास अटक

शेतकऱ्याकडून लाच घेणाऱ्या लेखापाल, प्रतवारीकारास अटक
शेतकऱ्याकडून लाच घेणाऱ्या लेखापाल, प्रतवारीकारास अटक

सोलापूर : वखार महामंडळांनी नाकारलेली तूर चाळणी केल्यानंतर परत घेण्यासाठी शेतकऱ्याकडून अडीच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लेखापाल आणि नाफेड प्रतवारीकारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी अटक केली.  अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लेखापाल राजशेखर श्रीमंत मुळे (वय ५५, , सोलापूर. रा. आदर्श नगर, मार्केट यार्डजवळ, अक्कलकोट), नाफेड प्रतवारीकार विनायक अंबादास जाधव (वय २९, रा. मु. पो. किणी, ता. अक्कलकोट) अशी आरोपींची नावे आहेत. तक्रारदार हे शेतकरी असून, त्यांनी २६ मार्च २०१८ रोजी ६४ पोते तूर अक्कलकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शासनाच्या हमीभाव केंद्रात विक्रीसाठी दिली होती. वखार महामंडळ, अक्कलकोट यांनी तक्रारदार शेतकऱ्याची ३१ पोते तूर खराब असल्याचे सांगून परत पाठवली. ती ३१ पोते तूर चाळणी करून परत वखार महामंडळ, अक्कलकोट येथे पाठवून जमा करून घेण्यासाठी तक्रारदार शेतकऱ्याकडून लेखापाल राजशेखर मुळे याने दोन हजार पाचशे रुपये लाचेची मागणी केली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com