agriculture news in Marathi, climate smart agriculture project started in India, Maharashtra | Agrowon

‘हवामान स्मार्ट शेती’ प्रकल्पाला प्रारंभ : राधामोहनसिंह
कोजेन्सिस वृत्तसेवा
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

‘हवामान स्मार्ट शेती’ प्रकल्प हा सरकारच्या २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्दिष्टाचाच एक भाग आहे. मागील सत्तर वर्षांपासून धोरण हे उत्पादन केंद्रित होते. आमच्या सरकारचा मानस हा शेती धोरण हे उत्पादन केंद्रित धोरणापासून उत्पन्न केंद्रित धोरणाकडे नेण्याचा आहे. 
- राधामोहनसिंह, केंद्रीय कृषिमंत्री

नवी दिल्ली : हवामानाच्या लहरीपणामुळे देशातील शेतीला दरवर्षी मोठा फटका बसतो. म्हणून त्या त्या भागातील शेतकऱ्यांना स्थानिक हवामानाची माहिती देऊन त्यांना हवामानपूरक शेती तंत्र वापरता यावे आणि पिकांची उत्पादकताही वाढावी यासाठी सरकारने ‘हवामान स्मार्ट शेती’ प्रकल्पाची सुरवात केली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी दिली. 

ते येथे आयोजित शेती २०२२-शेतकऱ्यांचे दुप्पट उत्पन्न शिखर परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी देशातील शेतकऱ्यांना हवामानाच्या लहरीपणामुळे सोसाव्या लागणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठीच्या उपाययोजनांची माहिती दिली. कृषिमंत्री सिंह म्हणाले, की आम्ही ‘हवामान स्मार्ट शेती’ प्रकल्पाला देशात या आधीच सुरवात केली आहे. या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना त्या भागातील हवामानाची अद्ययावत माहिती दिली जाईल.

शेतकऱ्यांना हमावान लहरीपणाची माहिती मिळाल्यास त्यांना हवामानपूरक शेती तंत्र वापरणे शक्य होणार आहे. २०१७-१८ च्या आर्थिक सर्वेक्षणात देशात नव्या शेती तंत्राची गरज असल्याचे सांगितले होते. त्यासाठी हवामानपूरक पीक पद्धतीचा अवलंब आणि पाण्याच्या कमी वापरात जास्त उत्पादकता देणारा असा ‘हवामान स्मार्ट शेती’ प्रकल्प राबविण्याची सूचना केली होती. 

‘‘हवामान स्मार्ट शेती’ प्रकल्पातून सरकार शेतकऱ्यांने उत्पन्न कसे वाढविता येईल यावर लक्ष केंद्रित केले आहे. सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्प्ट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याचाच एक भागा म्हणून देशात ‘हवामान स्मार्ट शेती’ प्रकल्प या आधीच सुरू केला आहे. सरकारला शेती धोरण हे उत्पादन केंद्रित धोरणापासून उत्पन्न केंद्रित धोरणाकडे न्यायचे आहे. सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्नवाढीसाठी प्रयत्नशील असून शेतीत आधुनिक असे प्रयोग राबविले जातील,’’ असेही कृषिमंत्री सिंह म्हणाले. 
 

 

इतर अॅग्रो विशेष
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
सीताफळाच्या योग्य जातींची करा लागवडमहाराष्ट्रात सीताफळाच्या झाडांचे काही नैसर्गिक...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
केसर आंबा पाडाला आलाय...औरंगाबाद : आपली चव, गंध आणि रूपाने ग्राहकांना...
बदल्या समुपदेशनानेच...पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने बदल्या...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
बारमाही भाजीपाला शेतीला नर्सरी...ब्राह्मणगाव (जि. नाशिक) येथील केवळ वाघ पूर्वी...
सुधारित तंत्राची मिळाली गुरुकिल्लीअकोला जिल्ह्याचे मुख्य उन्हाळी पीक कांद्याची...
भाराभर चिंध्या राज्यात १२७ वा पशुसंवर्धन दिन नुकताच साजरा...
मथुरेचं दूध का नासलं?राज्यात मे महिन्याचे तापमान यंदा नैसर्गिक आणि...
चिमुरड्याच्या कॅमेऱ्यात कैद आनंदी शेतकरीआपल्याकडील शेतकरी आनंदी असू शकतो का? उत्तर...
‘अ’तंत्र निकेतनपुरेसा अभ्यास आणि तयारीअभावी, यंत्रणेचा विरोध...