agriculture news in Marathi, Clinked anticipated 500 to 2100 rupees in the state | Agrowon

राज्यात कलिंगड प्रतिक्विंटल ५०० ते २१००  रुपये
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते ११०० रुपये

अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते ११०० रुपये
अकोला ः रखरखत्या उन्हामुळे अकोल्याच्या बाजारात मागणी वाढलेल्या कलिंगडाला ठोक दर ६०० ते ११०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान मिळत आहे. उच्चतम दर्जाची फळे १००० ते ११०० रुपये प्रतिक्विंटल आणि दुय्यम दर्जाच्या फळांना ६०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. येथे दररोज ३० ते ५० टन दरम्यान आवक आहे. या भागात तापमानाचा पारा सातत्याने ४२ अंश सेल्सिअसवर राहत आहे. या तापमानात शरीराला थंड ठेवण्यासाठी विविध पदार्थ, फळांचा वापर वाढलेला आहे. कलिंगड हे फळ त्यापैकीच एक असून, सध्या मागणी वाढली असल्याने दरांमध्ये सुधारणा झाली आहे. १५ दिवसांपूर्वीच्या दरात २०० रुपयांनी सुधारणा झाली आहे. कलिंगडाचा दर ६०० ते ११०० दरम्यान मिळत आहे. अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यासह जळगाव खानदेश भागातून या ठिकाणी आवक होत आहे. कलिंगडाची किरकोळ विक्री सर्रास २० रुपये प्रतिकिलो दराने होत आहे. मागणीच्या तुलनेत सध्या आवक स्थिर आहे. येत्या काळात आवक कमी झाल्यास दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापारी सूत्राकडून व्यक्त करण्यात आली.

सोलापुरात प्रतिक्विंटल ५०० ते १५०० रुपये 
सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कलिंगडाला मागणी राहिली. तसेच, दरही टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. कलिंगडाला प्रतिक्विंटला सर्वाधिक १५०० रुपये इतका दर मिळाला. कलिंगडाला प्रतिक्विंटलला किमान ५०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक १५०० असा दर मिळाला. गतसप्ताहात कलिंगडाची आवक बाजारात प्रतिदिन एक ते दोन गाड्या झाली. कलिंगडाची सर्व आवक स्थानिक भागातूनच होती. आधीच्या सप्ताहातही त्याची आवक रोज २ ते ३ गाड्यापर्यंत राहिली. तर प्रतिक्विंटलचा दर किमान ४०० रुपये, सरासरी ७०० रुपये आणि सर्वाधिक १४०० रुपये असा राहिला. त्या आधीही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कलिंगडाची आवक जेमतेम रोज एखादी गाडी अशीच राहिली. पण दर पुन्हा स्थिर होते. त्या सप्ताहात कलिंगडाला किमान ५०० रुपये, सरासरी ७५० रुपये आणि सर्वाधिक १५०० रुपये असा दर राहिल्याचे सांगण्यात आले.

जळगावात प्रतिक्विंटल ५०० ते ११०० रुपये
जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. २५) कलिंगडाची आठ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल ५०० ते ११०० रुपये असा मिळाला. आवक पाचोरा, एरंडोल, जामनेर, जळगाव, यावल या भागांतून होत आहे. दर स्थिर असून, महिनाभरात किमान दर ४०० रुपायांखाली गेलेले नाहीत. जिल्ह्यात काश्मीर, दिल्ली, राजस्थान भागांतील खरेदीदार एजंटच्या माध्यमातून खरेदी करीत असून, ४ किलोच्या फळाला थेट जागेवर ५ रुपये प्रतिकिलो दर दिला जात आहे, अशी माहिती मिळाली. 

नाशिकमध्ये प्रतिक्विंटल ५५० ते ११०० रुपये
नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २४) टरबुजाची आवक ३२० क्विंटल झाली होती. त्यास प्रतिक्विंटल ५५० ते ११०० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ८०० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.मंगळवारी (ता. २३) टरबुजाची आवक ४१० क्विंटल झाली. त्यास ५५० ते ११०० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ८०० रुपये होता. सोमवारी (दि. २२) टरबुजाची आवक ४६० क्विंटल झाली. तिला ५५० ते ११०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण सर ८०० मिळाला. गुरुवारी (ता. १८) टरबुजाची आवक ३१० क्विंटल झाली. तिला ५५० ते ११०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ८०० होते. गुरुवारी (ता. १६) टरबुजाची आवक ६४० क्विंटल झाली. त्यास ५५० ते ११५० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ८०० होते. मागील आठवड्यापासून बाजार समितीत टरबुजाची आवक कमी जास्त दिसून आली. गत आठवड्यापासून दर स्थिर आहेत.

औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल ६०० ते ९०० रुपये
औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २५) कलिंगडाची १४० क्‍विंटल आवक झाली. या कलिंगडाला ६०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. औरंगाबाद बाजार समितीमध्ये २६ मार्चला १३९ क्‍विंटल आवक झालेल्या कलिंगडला ७०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला होता. ३० मार्चला कलिंगडाची आवक ३१० क्‍विंटल, तर दर ६०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ८ एप्रिलला ३१० क्‍विंटल आवक झालेल्या कलिंगडाला ५०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ९ एप्रिलला २२० क्‍विंटल आवक झालेल्या कलिंगडाचे दर ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १० एप्रिलला ३३० क्‍विंटल आवक झालेल्या कलिंगडाचे दर ३०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ११ एप्रिलला ३७० क्‍विंटल आवक झालेल्या कलिंगडला ७०० ते १००० रुपये प्रतिक्‍विटंलचा दर मिळाला. २० एप्रिलला कलिंगडाची आवक १२० क्‍विंटल, तर दर ८०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सांगलीत प्रतिक्विंटल ७०० ते २१०० रुपये
सांगली ः येथील विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात कलिंगडाची आवक कमी अधिक आहे. गुरुवारी (ता. २५) कलिंगडाची २५० डझनाची आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल ७०० ते २१००, तर सरासरी १३२५ रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.बाजार समितीच्या आवारात, सांगली जिल्ह्यातील वाळवा, मिरज, पलूस, कडेगाव या तालुक्यांसह कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातून कलिंगडाची आवक होते. वाढत्या उन्हामुळे कलिंगडाची मागणी वाढली आहे. बुधवारी (ता. १७) कलिंगडाची २२५ डझन आवक झाली होती. त्यास प्रतिक्विंटल ५०० ते २०००, तर सरासरी १२५० रुपये असा दर होता. गुरुवारी (ता. १८) कलिंगडाची आवक ६२ डझन झाली असून, त्यास प्रतिक्विंटल ५०० ते २०००, तर सरासरी १२५० रुपये असा दर मिळाला. शनिवारी (ता. २०) कलिंगडाची ५२० डझन आवक झाली होती. कलिंगडास प्रतिक्विंटल ५०० ते २०००, तर सरासरी ११०० रुपये असा दर मिळाला. बुधवारी (ता. २४) कलिंगडाची २४६६६ डझन आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल ५०० ते २००० सरासरी १२५० असा दर मिळाला. गत सप्ताहापेक्षा चालू सप्ताहात कलिंगडाच्या आवकेत किंचित वाढ झाली असून, दर स्थिर आहे.

परभणीत प्रतिक्विंटल ५५० ते १२०० रुपये
परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. २५) टरबुजांची ३०० क्विंटल आवक झाली होती. टरबुजाला प्रतिक्विंटल ५५० ते १२०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.येथील मार्केटमध्ये गेल्या आठवड्यापासून स्थानिक परिसरातून टरबुजाची आवक होत आहे. दररोज ३०० ते ४०० क्विंटल आवक होत आहे. गुरुवारी (ता. २५) टरबुजांची ३०० क्विंटल आवक झाली असताना घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल ५५० ते १२०० रुपये होते. तर किरकोळ विक्री प्रतिकिलो १५ ते २० रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी नईम भाई यांनी सांगितले.

कोल्हापुरात प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये
कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कलिंगडाची दररोज शंभर ते दोनशे क्विंटल इतकी आवक होत आहे. कलिंगडास प्रतिक्विंटलला ५०० ते १००० रुपये इतका दर मिळत आहे. बाजार समितीत कोल्हापूर बरोबर सांगली जिल्ह्यातूनही कलिंगडाची आवक होते. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी कलिंगडाची लागवड झालेली आहे. उन्हाळ्यात कलिंगडाची मागणी वाढत असल्याने शेतकरी कलिंगडाची काढणी काढत आहेत. यामुळे कलिंगडाच्या आवकेत वाढ होत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

गुलटेकडीत प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये
पुणे ः गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २५) कलिंगडाची सुमारे ४० टेम्पाे आवक झाली हाेती. या वेळी प्रति किलोला सुमारे ८ ते १२ रुपये एवढा दर हाेता. उन्हाळ्यामुळे कलिंगडांची आवक आणि मागणी माेठ्या प्रमाणावर असल्याने दर स्थिर असल्याचे आडतदारांनी सांगितले. आवक ही प्रामुख्याने राज्याच्या विविध भागांतून हाेत आहे.

इतर ताज्या घडामोडी
सेंद्रिय पशुपालन पक्ष्यांच्या...फिनलँड येथील युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकी येथील...
सावळी मोहितकर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून...नागपूर ः शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी स्तरावर...
हळदीला १० हजार रुपये क्विंटल हमीभाव...नांदेड : राज्य आणि केंद्र सरकारने हमीभावाच्या...
चिखलीतील तेल्हारा धरणाच्या गेटदुरुस्तीस...बुलडाणा ः पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या चिखली...
गंगापुरात बनावट खतसाठा जप्तऔरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर येथील एका खत...
सहकार आयुक्तालयातील नियुक्त्यांचे घोळ...पुणे  : दुष्काळ, कर्जमाफी आणि घसरलेले...
संत्रा बाग वाळल्याने नयाखेडा येथील...अमरावती ः चार बोअरवेल घेतले, इतरांच्या...
नाशिकमध्ये टरबूज प्रतिक्विंटल ७०० ते...नाशिक : नाशिकमध्ये टरबुजाची आवक ९६० क्विंटल झाली...
झाडावर नाही, काळजावर घाव पडतात नगर ः ‘‘दहा वर्षांपूर्वी संत्र्याची लागवड केली...
सातारा जिल्ह्यात २५४ टँकरद्वारे...सातारा  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची...
नगरमधील शेतकऱ्यांना साडेचाळीस कोटींचे...नगर  ः सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल २००...
सांगलीत शेतकऱ्यांचा जनावरांसह मोर्चासांगली  : जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता...
वऱ्हाडात बाजी कुणाची?अकोला ः  लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही...
पुणे विभागात ‘जलयुक्त’ची आठ हजारांवर...पुणे : भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने...
नेता निवडीचा अधिकार राहुल गांधींनामुंबई  ः काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ नेता...
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...