agriculture news in marathi, Closed to many shopping centers of Commodity | Agrowon

अनेक भरडधान्य खरेदी केंद्रे बंदच
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017

जळगाव : जिल्ह्यात दिवाळीनंतर सुरू केलेल्या तीन कडधान्य खरेदी केंद्रांवर गुरुवारपर्यंत (ता. १६) सोयाबीन, उडीद, मुगाची मिळून फक्त २३०० क्विंटल खरेदी झाली. तर १५ पैकी १३ भरडधान्य खरेदी केंद्र गोदाम न मिळाल्याने अजून बंद स्थितीत आहेत.

जळगाव : जिल्ह्यात दिवाळीनंतर सुरू केलेल्या तीन कडधान्य खरेदी केंद्रांवर गुरुवारपर्यंत (ता. १६) सोयाबीन, उडीद, मुगाची मिळून फक्त २३०० क्विंटल खरेदी झाली. तर १५ पैकी १३ भरडधान्य खरेदी केंद्र गोदाम न मिळाल्याने अजून बंद स्थितीत आहेत.

भरडधान्य खरेदी केंद्र १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. त्यानंतर जिल्ह्यात हे केंद्र सुरू करण्याची तयारी झाली. यावल वगळता इतर सर्व १४ तालुके व शेंदूर्णी (ता.जामनेर) येथे भरडधान्य खरेदी केंद्र सुरू झाले. यातील फक्त अमळनेर येथील खरेदी केंद्रात २३ क्विंटल ज्वारीची खरेदी झाली आहे. इतर १४ केंद्रांमध्ये तहसीलदार कार्यालयाने आपली गोदामे उपलब्ध करून दिली नसल्याने कुठल्याही भरडधान्याची खरेदी झालेली नाही.

या समस्येची माहिती मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनाही सांगितली आहे. पुरवठा विभागाने तहसीलदार यांना पत्र देऊन भरडधान्य खरेदीसाठी तातडीने गोदामे उपलब्ध करून द्यावीत, अशा सूचना दिल्या आहेत.

कडधान्य खरेदी केंद्र सुरू होऊन २० दिवस झाले. पाचोरा, जळगाव आणि अमळनेर येथे बाजार समित्यांच्या आवारात ही केंद्रे आहेत. त्यात सोयाबीन, मूग व उडीद यांची मिळून गुुरुवारपर्यंत फक्त २३०० क्विंटल खरेदी झाल्याची माहिती मिळाली.

यावल तालुक्‍यात भरडधान्य खरेदी केंद्र सुरूच झाले नाही. यावल येथील कुठलीही सहकारी संस्था हे खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी सब एजंट म्हणून काम करायला तयार नाही. त्यामुळे आता जळगाव शहरातील कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेला यावल येथे भरडधान्य खरेदी केंद्र सुरू करण्यासंबंधीचा प्रस्ताव मार्केटिंग फेडरेशनने दिला आहे. त्याला फेडरेशनने होकार दिला असून, यावलचे केंद्र लवकरच सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली.

यंदा आधार क्रमांक, सातबाऱ्यावर संबंधित धान्याची नोंद हवी, बॅंक खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक याची नोंद करून ऑनलाइन माहिती सादर करायची आहे. यानंतर खरेदीचा संदेश संबंधित शेतकऱ्याच्या मोबाईलवर जातो. पण ही नोंदणीची प्रक्रिया किचकट, जाचक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच या केंद्रांवर फारसे धान्य शेतकरी आणत नसल्याचे चित्र आहे.

कडधान्य खरेदी केंद्रांना यंदा प्रतिसाद दिसत नसला तरी मागील आठवड्यात आवक वाढली आहे. पुढे आवकेत वाढ होईल. तसेच भरडधान्य खरेदी केंद्र संबंधित तहसील कार्यालयांकडून गोदाम न मिळाल्याने बंद अवस्थेत आहेत.
- सुभाष पी. माळी, विपणन अधिकारी, मार्केटिंग फेडरेशन

इतर बातम्या
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...
पाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...
शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...
हुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा  ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...
जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
पाण्याअभावी फळबागांवर संकटअकोला : फळबागांसाठी अोळख असलेल्या अकोट तालुक्यात...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
तूर हमीभाव नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठसांगली : खरेदी केंद्रात तूर विक्रीसाठी ऑनलाइन...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...