agriculture news in marathi, cloud cover reduces temperature in state | Agrowon

ढगाळ हवामानामुळे पारा घसरला
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 25 मे 2018

पुणे : मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात व परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आणि कर्नाटकच्या दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र, यामुळे मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत ढगाळ हवामान होते. परिणामी कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत तीन ते चार अंश सेल्सिअसने घसरला आहे. गुरुवारी (ता. २४) सकाळी मध्य महाराष्ट्र व कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा शिडकावा झाला. 

पुणे : मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात व परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आणि कर्नाटकच्या दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र, यामुळे मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत ढगाळ हवामान होते. परिणामी कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत तीन ते चार अंश सेल्सिअसने घसरला आहे. गुरुवारी (ता. २४) सकाळी मध्य महाराष्ट्र व कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा शिडकावा झाला. 

केरळसह पश्चिम किनारपट्टीवर उद्या(शनिवार)पासून पावसाची शक्यता आहे. कोकणातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात कमाल तापमानात चढउतार होत असून विदर्भात व मराठवाड्यातील काही भागात उन्हाचा चटका कायम आहे. गुरुवारी (ता. २४) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासामध्ये विदर्भातील चंद्रपूर येथे ४३.६ अंश सेल्सिअसची उच्चांकी कमाल तापमानाची नोंद झाली. 

सोमवारपर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असून हवामान ढगाळ राहील. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातही ऊन सावल्याचा, तर अधूनमधून ढगाळ हवामान राहणार आहे. कोकणातील पारा ३५ अंशांच्या दरम्यान आहे.  मध्य महाराष्ट्रातही कमाल तापमान ४० अंशांच्या दरम्यान होते. मराठवाडा व विदर्भात ४० ते ४३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमान होते. 

 बुधवारी रात्रीनंतर अचानक हवामानात बदल होत मध्य महाराष्ट्र, कोकणात व मराठवाड्यातील काही भागांत ढग जमा झाले. पहाटे आंबा आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर सकाळी हलका पाऊस पडला. पुणे शहराच्या परिसरात ढगाळ हवामान होते, तर शहराच्या काही उपनगरांत हलका पाऊस पडला. सोलापूर, सातारा, सांगली, नगर, नाशिक, औरंगाबाद, परभणी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारपर्यंत हवामान ढगाळ होते. दुपारनंतर ढगाळ हवामानाची तीव्रता कमी होऊन उन्हाची झालर पसरली होती. 
 

इतर अॅग्रो विशेष
कोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...
कमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
होय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...
‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला :  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
शेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...
नाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...
अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...
अठरा गावांनी केली कचऱ्यापासून गांडूळखत...गावे आणि वाडीवस्त्याही स्वच्छतेत अग्रभागी...
‘सीसीआय’च्या खरेदीला दिवाळीत मुहूर्तमुंबई : देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...
सिंचन योजनांचे अर्थसाह्य महामंडळाच्या...मुंबई : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतील...
मुरघास : चाराटंचाईवर उत्तम पर्यायउन्हाळ्यामध्ये किंवा चारा तुटीच्या काळात...
बाजारात टंचाईमुळे ‘पांढऱ्या सोन्या'च्या...जळगाव ः देशात कापसाची सर्वाधिक सुमारे ४० लाख हेक्...
दिवसा वीजपुरवठ्याचे स्वप्न प्रत्यक्षात...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषी पंप...
विजयादशमीनिमित्त फुलांना मागणी वाढलीपुणे ः गुरुवारी (ता. १८) साजऱ्या हाेणाऱ्या...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची...पुणे: राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू...
मराठवाड्यात यंदा शेतकऱ्यांचे...औरंगाबाद : कमी पाऊस आणि मोठा खंड यामुळे...
ऊर्जा विभागाच्या योजनांचा शेतकऱ्यांना...मुंबई  : ऊर्जा विभागाने लोकहिताच्या व...
राज्यात २७ लाख हेक्टरवर होणार ज्वारी...पुणे : केंद्र सरकारच्या नव्या धोरणाप्रमाणे...
सणासुदीत अर्थकारण उंचावणारे पेरीडकरांचे...गणपती उत्सवापासून ते अगदी दसरा, दिवाळीस तुळशीच्या...