कोकण, मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण

कोकण, मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण
कोकण, मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण

 पुणे : तमिळनाडू आणि बंगालचा उपसागर ते श्रीलंकेचा दक्षिण भाग यादरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. तसेच मालदीव ते अरबी समुद्र व कर्नाटक यादरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे कोकणातील, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत ढगाळ हवामान तयार झाले आहे.  उद्या (ता. ७) दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेली पिके, चारापिके यांची योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाच्या सूत्रांनी केले.  मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. मराठवाड्यातील काही भागांत कोरडे हवामान असून, उस्मानाबाद येथे १०.७ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com