agriculture news in marathi, cloudy climate in jalgaon, maharashtra | Agrowon

जळगाव जिल्ह्यात ढगाळ हवामानाचा केळी पिकाला फटका
टीम अॅग्रोवन
शनिवार, 3 मार्च 2018
जळगाव  ः जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. त्याचा फटका केळी पिकाला बसत आहे. शेतकऱ्यांना फवारणी करून करपा रोगाचा अटकाव करावा लागत आहे. तसेच कापणी व मळणीची कामे तातडीने आवरून घेण्यासाठी, शेतातील कणसे, हरभऱ्याचे ढीग झाकण्यासाठी रोजच धावपळ करावी लागत असल्याने शेतकरी त्रस्त आहेत.
 
जळगाव  ः जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. त्याचा फटका केळी पिकाला बसत आहे. शेतकऱ्यांना फवारणी करून करपा रोगाचा अटकाव करावा लागत आहे. तसेच कापणी व मळणीची कामे तातडीने आवरून घेण्यासाठी, शेतातील कणसे, हरभऱ्याचे ढीग झाकण्यासाठी रोजच धावपळ करावी लागत असल्याने शेतकरी त्रस्त आहेत.
 
होळी व रंगपंचमी या काळात निरभ्र हवामान असले तर गहू, हरभरा, दादर यांची कापणी, मळणी वेगाने केली जाते; परंतु यंदा ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगाम घेणाऱ्या शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. अनेक शेतकरी गव्हाची मळणी मोठ्या मशिनद्वारे करून घेत आहेत. त्यात कापणी व गहू गोळा करण्याचे श्रम लागत नाहीत. तसेच वेळेची बचत होते.
 
ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाली असून, ते १६ अंश सेल्सिअस पुढे गेले आहे. कमाल तापमानही ३७ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. मागील तीन ते चार दिवस दिवसा उकाडा व उन्हाचे चटके अधिकचे जाणवत आहेत.
 
निरभ्र वातावरण नसल्याने खेळती हवादेखील नाही. पूर्व ते पश्‍चिम असे वारे वाहत आहेत. तापमानवाढीमुळे केळी उत्पादकांना आपल्या बागांभोवती वारा अवरोधक उभारण्याचे काम सुरू करावे लागले आहे. अनेक शेतकरी हिरवी जाळी बागेभोवती लावत आहेत.

इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...
हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर झाले...नागपूर ः शासनाची हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर...
नगरला गव्हाला १६४१ ते १८५० रुपये...नगर : नगर बाजार समितीत गव्हाची आवक बऱ्यापैकी होत...
नाशिकला आंबा, खरबूज, कलिंगड तेजीतनाशिक : वाढत्या उन्हाबरोबरच नाशिक बाजार समितीत...
कासवाच्या लिंगनिर्धारणामागील जनुकीय...गेल्या ५० वर्षांपासून अंडी उबण्याच्या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा  : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा वाढू...
अग्रणी नदी पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यातसांगली : तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील अग्रणी...
पुण्यातील डाळिंब, पेरू, चिकू बागांना...पुणे  : जिल्ह्यातील मृग बहारातील डाळिंब,...
इंदापुरातील नीराकाठची पिके जळण्याच्या...वालचंदनगर, जि. पुणे  ः इंदापूर तालुक्‍यातील...
नगर जिल्ह्यात ‘कृषी’च्या कामांवरच ‘...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानाची कामे...
विषबाधा बळीप्रकरणी पावणेदोन कोटींची मदतअकोला : कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन मृत...
हिंगोलीतील १०३ गावांची ‘जलयुक्त शिवार’...हिंगोली : जलयुक्त शिवार अभियानाच्या चौथ्या...
विधान परिषदेच्या ६ जागांसाठी उत्साहात...मुंबई ः स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान...
सैन्य दलात अधिकारी होण्याची संधीमुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात...
कर्नाटक: कामगारांच्या पत्राशेडमध्ये...विजयपूर : नुकतेच कर्नाटकात विधानसभेची निवडणुका...