agriculture news in marathi, cloudy weather fears grape farmers | Agrowon

ढगाळ हवामानाने द्राक्षउत्पादक चिंताग्रस्त
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

सांगली ः जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि पावसाच्या हलक्‍या सरींमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात एक लाख २० हजार एकरांवर द्राक्षबाग आहे. त्यातील ३० टक्के बागा अवकाळी पावसामुळे खराब झाल्या आहेत. यंदाच्या हंदामात ३५-४० टक्के द्राक्ष बागांची विक्री झालेली आहे; तर उर्वरित ३५ टक्के बागांवरील द्राक्षाची विक्री शिल्लक आहे. जिल्ह्यातील हंगाम मार्चअखेर लांबण्याची शक्‍यता आहे. खराब हवामानामुळे फळछाटण्या विलंबाने घेतल्या आहेत. 

सांगली ः जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि पावसाच्या हलक्‍या सरींमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात एक लाख २० हजार एकरांवर द्राक्षबाग आहे. त्यातील ३० टक्के बागा अवकाळी पावसामुळे खराब झाल्या आहेत. यंदाच्या हंदामात ३५-४० टक्के द्राक्ष बागांची विक्री झालेली आहे; तर उर्वरित ३५ टक्के बागांवरील द्राक्षाची विक्री शिल्लक आहे. जिल्ह्यातील हंगाम मार्चअखेर लांबण्याची शक्‍यता आहे. खराब हवामानामुळे फळछाटण्या विलंबाने घेतल्या आहेत. 

ढगाळ हवामानामुळे द्राक्षांत भुरी व मण्याला तडा जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. यंदा विविध प्रकारच्या चांगल्या दर्जाच्या द्राक्षाच्या पेटीला सरासरी दर १७० ते १८० रुपये मिळतो आहे. शेतकऱ्याची कोंडी करून गुंतवलेल्या रकमेएवढाही पैसा त्यांच्या पदरात पडू दिला जात नाही. चांगल्या दर्जाच्या मालही कमी दराने खरेदी केला जातो आहे. खराब मालाला यापेक्षा कमी दर मिळत असल्याचे सध्याचे चित्र आहे.

पुढील पाच-सहा दिवस ढगाळ हवामान आणि वातावरणात बदल राहण्याचा अंदाज आहे. बदलत्या वातावरणामुळे हंगामाच्या सुरवातीपासून द्राक्ष शेती अडचणीत आहे. थंडीत दर कमी होते. सध्याच्या ढगाळ हवामानात पुन्हा दलालांकडून दर पाडले जात आहेत. उत्पादन खर्चाचा ताळमेळही जमत नसल्याचे सध्याचे चित्र आहे.
- सुभाष आर्वे,
अध्यक्ष, राज्य द्राक्ष बागायतदार संघ

इतर बातम्या
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कासवाच्या लिंगनिर्धारणामागील जनुकीय...गेल्या ५० वर्षांपासून अंडी उबण्याच्या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा  : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा वाढू...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
अग्रणी नदी पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यातसांगली : तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील अग्रणी...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पुण्यातील डाळिंब, पेरू, चिकू बागांना...पुणे  : जिल्ह्यातील मृग बहारातील डाळिंब,...