डल्ला मारणाऱ्यांची हल्लाबोल यात्रा : मुख्यमंत्री

बीड : जलपूजन, जलवितरण आणि कूपनलिका कामाचे भूमिपूजन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
बीड : जलपूजन, जलवितरण आणि कूपनलिका कामाचे भूमिपूजन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

बीड : शेतकऱ्यांच्या जमिनी सिंचनाखाली आणण्याऐवजी स्वतःचे सिंचन करणारे आणि पंधरा वर्षे डल्ला मारणारे आता हल्लाबोल करत आहेत, अशी उपरोधिक टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता. १) केली. यांचे पंधरा वर्षांतील कारनामे जनतेसमोर मांडून यांचाच हल्लाबोल यांच्यावर उलटवू, असेही फडणवीस म्हणाले.

वडवणी तालुक्यातील सोन्नाखोटा येथील ऊर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्पाचे जलपूजन, जलवितरण आणि कूपनलिका कामाचे भूमिपूजन शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या सरपंच परिषदेत फडणवीस म्हणाले, की आम्ही चूक असलो तरी बेईमान नाही. कृषी विकासाचा दर १२.५० टक्के झाला आहे. उद्योगात राज्य पहिल्या क्रमांकावर आले असून, देशात झालेल्या गुंतवणुकीपैकी निम्मी गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे.

येत्या सात महिन्यांत प्रकल्पाचे काम पूर्ण करून शेतकऱ्यांना शेतात पाणी दिले जाईल, असे गिरीश महाजन म्हणाले. ग्रामविकास खात्यांतर्गत राज्यात ३० हजार किलोमीटर रस्ते बांधकाम सुरू असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.

ऊर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्पामुळे पाण्याचा अपव्यय होणार नाही. ३०४ हेक्टर क्षेत्रावर उभारला असून, नऊ गावांतील २८०० हेक्टर जमीन या प्रकल्पातून ओलिताखाली येणार आहे. १८.७७ दलघमी क्षमता असलेल्या प्रकल्पासाठी पाच गावांतील २४१ कुटुंब बाधित झाले असून, रुई पिंपळा गाव विस्थापित होऊन पुनर्वसित झाले. आता १० किलोमीटर अंतर पाइपलाइन अंथरली जाणार आहे. एकूण ३१८ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पावर आतापर्यंत २१९ कोटी रुपये खर्च झाले आहेत

या वेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे, आमदार भीमराव धोंडे, आमदार आर. टी. देशमुख, लक्ष्मण पवार, संगीता ठोंबरे, भाजप नेते रमेश आडसकर विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह, पोलिस अधीक्षक जी. श्रीधर उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com