agriculture news in marathi, CM Devendra Fadanvis criticizes Congress leader Nana Patole | Agrowon

अहंकारातूनच माजी खासदाराने जनतेवर निवडणूक लादली : मुख्यमंत्री
टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 मे 2018

भंडारा : पालघरमध्ये खासदारांचे निधन झाले म्हणून पोटनिवडणूक घ्यावी लागली; पण भंडारा-गोंदियात काय झाले? असा प्रश्‍न उपस्थित करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदारांच्या अहंकारामुळे ही निवडणूक जनतेवर लादली गेल्याची टीका केली. 

भंडारा : पालघरमध्ये खासदारांचे निधन झाले म्हणून पोटनिवडणूक घ्यावी लागली; पण भंडारा-गोंदियात काय झाले? असा प्रश्‍न उपस्थित करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदारांच्या अहंकारामुळे ही निवडणूक जनतेवर लादली गेल्याची टीका केली. 

मोहाडी येथील हुतात्मा स्मारकाजवळील पटांगणात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकूळे, आमदार हेमंत पटले, आमदार अनिल सोले, चरण वाघमारे, आमदार रामचंद्र अवसरे, माजी खासदार शिशुपाल पटले, आमदार विकास कुंभारे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार सुधाकर कोहळे, राजेश पटले, भाऊराव तुमसरे, माजी आमदार हरीश मोरे, आनंद राऊत यांची या वेळी उपस्थिती होती. 

मुख्यमंत्री म्हणाले, रावणाचा निःपात अहंकारानेच केला. कौरवदेखील अहंकारामुळेच संपले. त्याच धर्तीवर माजी खासदारांच्या अहंकाराचा निःपातदेखील मतदार करतील. या खासदाराने २००९ मध्येही असाच राजीनामा दिला होता. त्या वेळी लोकांचे सहकार्य मिळाले असेलही; पण नंतर लोकांना कळाले हा राजीनामा शेतकऱ्यांसाठी नव्हता, मतदारांच्या फायद्यासाठी नव्हता तर स्वस्वार्थासाठी होता. त्यामुळे लोकांच्या मनात या राजीनाम्याबद्दल तीव्र आक्रोश आहे. हा आक्रोश मतपेट्यांमधून दिसणार आहे. हेमंत पटले यांना निवडूण देण्याचे आवाहन त्यांनी केले.

इतर ताज्या घडामोडी
बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...
नागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर   ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...
खानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव  : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...
साखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई  ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर   : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...
जळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
संग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा   : अाधारभूत किमतीने शेतीमाल...
एफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई  : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...
गोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया  ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...
मदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला  ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...
सातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...
‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा  ...
बेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...
भुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...
नगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
गुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई   : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी  ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...