शेततळ्यांचे २०४ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा ः मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

मुंबई : शेततळ्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे थेट जमा केल्यामुळे भ्रष्टाचार थांबला. या वर्षी शेततळ्यांसाठी एकूण २ लाख ८३ हजार ६२० अर्ज प्राप्त झाले. त्यातील ५१ हजार ३६९ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली असून, २०४ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले अाहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (ता. १७) सांगितले.

‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, की महाराष्ट्रात राज्य शासनाच्या ३९९ सेवा ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. ऑनलाइन सेवांच्या माध्यमातून जवळपास १.१४  कोटी अर्ज आपल्याला प्राप्त झाले आणि यापैकी १.०८ कोटी म्हणजे लोकांना म्हणजे जवळजवळ ८८ टक्के सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.

याचबरोबर राज्य शासनाने सुरू केलेले ‘आपले सरकार पोर्टल’ या पोर्टलवर आलेल्या तक्रारीपैकी ८८ टक्के तक्रारी वेळेत निकाली काढण्यात आल्या असून, ७८ टक्के लोकांनी निकालावर समाधान व्यक्त केल्याचे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘भारतनेट’च्या संकल्पनेवर आधारित राज्यात ‘महानेट’ योजना सुरू केली आहे. याद्वारे आतापर्यंत १४ हजार ग्रामपंचायती फायबर ऑप्टिकने जोडल्या असून, २०१८ अखेरपर्यंत सर्व ग्रामपंचायतींमध्ये महानेटचे काम होईल. प्रत्येक ग्रामपंचायतीला फायबर ऑप्टिकद्वारे नेट कनेक्टिव्हीटी देण्याचीही ४ हजार कोटी रुपयांची योजना आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘स्मार्ट सिटी’च्या धर्तीवर ‘स्मार्ट ग्रामपंचायत’ ग्रामीण डिजिटल साक्षरता योजनेअंतर्गत ४४ लाख ग्रामीण नागरिकांना डिजिटल साक्षर करण्याचे ध्येय आहे. २९ हजार ग्रामपंचायतींपैकी आतापर्यंत १४ हजार ग्रामपंचायतीतील फायबर ऑप्टिकचे काम पूर्ण झाले आहे. ‘स्मार्ट सिटी’च्या धर्तीवर २०१८ पर्यंत प्रत्येक ग्रामपंचायत ‘स्मार्ट ग्रामपंचायत’ झालेली असेल, असे ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com