agriculture news in marathi, CM, Sharad Pawar and Nitin Gadkari Cancels their tour | Agrowon

मुख्यमंत्री, पवार, गडकरी यांचे मराठवाड्यातील दौरे रद्द
सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

औरंगाबाद : कोरेगाव भीमा येथील घटनेनंतर गेल्या तीन दिवसांपासून राज्यात उमटत असलेले हिंसक पडसाद आणि ‘बंद’च्या पार्श्‍वभूमीवर राजकीय नेत्यांचे मराठवाड्यातील नियोजित दौरे रद्द करण्यात आले आहेत.

औरंगाबाद : कोरेगाव भीमा येथील घटनेनंतर गेल्या तीन दिवसांपासून राज्यात उमटत असलेले हिंसक पडसाद आणि ‘बंद’च्या पार्श्‍वभूमीवर राजकीय नेत्यांचे मराठवाड्यातील नियोजित दौरे रद्द करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी कृषिमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज (ता. ५) विविध कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी मराठवाड्यात येणार होते. शुक्रवारी (ता. ५) औरंगाबाद येथे ५ ते ८ जानेवारीदरम्यान भरवण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय ''महा-ऍग्रो'' कृषी प्रदर्शनाच्या उद्‍घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार हे एकाच व्यासपीठावर येणार होते. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याजवळील रस्त्यांच्या कामांस प्रारंभ करण्यासाठी बीड जिल्ह्यात उपस्थित राहणार होते. परंतु या तीनही प्रमुख नेत्यांचे मराठवाड्यातील नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. 

बुधवारच्या ‘महाराष्ट्र बंद’दरम्यान, मराठवाड्यात अनेक हिंसक घटना घडल्या. त्यामुळे आजपासून बाजरपेठा सुरू झाल्या असल्या तरी वातावरण अद्याप पूर्णपणे निवळलेले नाही.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...
हिंगोली, नांदेड, परभणीत आॅनलाइन नोंदणीत...परभणी   ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
वारणा नदीवरील बंधारा दुरुस्तीमुळे...कोल्हापूर  : वारणा नदीवरील विविध बंधाऱ्यांची...
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...