agriculture news in Marathi, co-operation of Netherlands for state agriculture development, Maharashtra | Agrowon

राज्याच्या शेतीसाठी नेदरलँड्सचे सहकार्य घेणार ः कृषिमंत्री फुंडकर
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

बारामती, जि. पुणे ः महाराष्ट्राच्या शेतीपुढील समस्या लक्षात घेता राज्याच्या कृषी आराखड्यासाठी नेदरलँड्स्ससारख्या प्रगत देशाची मदत घ्यावी असा शासनाचा विचार आहे. आता राज्याचा कृषी आराखडा करताना नेदरलँड्समधील तज्ज्ञांची समिती स्थापन करून त्यांच्या मदतीने शेतकरी हिताचे प्रकल्प व तंत्रज्ञान महाराष्ट्रात वापरण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल, असे राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी येथील कार्यक्रमात जाहीर केले.

बारामती, जि. पुणे ः महाराष्ट्राच्या शेतीपुढील समस्या लक्षात घेता राज्याच्या कृषी आराखड्यासाठी नेदरलँड्स्ससारख्या प्रगत देशाची मदत घ्यावी असा शासनाचा विचार आहे. आता राज्याचा कृषी आराखडा करताना नेदरलँड्समधील तज्ज्ञांची समिती स्थापन करून त्यांच्या मदतीने शेतकरी हिताचे प्रकल्प व तंत्रज्ञान महाराष्ट्रात वापरण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल, असे राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी येथील कार्यक्रमात जाहीर केले.

अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात उभारण्यात आलेल्या भारतातील पहिल्या इंडो-डच भाजीपाला गुणवत्ता केंद्राचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. २) नेदरलँड्सचे कृषिमंत्री अल्ड्रेक खिअरवेल्ड व राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते झाले.

या वेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, राहुरी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सय्यद शाकिरअली आदी उपस्थित होते.

या वेळी फुंडकर म्हणाले, की सन २०१२ मध्ये भारत व डच सरकारमध्ये झालेल्या सामंजस्य करारातून दोन गुणवत्ता केंद्रे उभारण्यास सुरवात झाली. त्यापैकी शारदानगरमध्ये नेदरलँड्स तंत्रज्ञानावर उभारलेला भाजीपाला प्रकल्प देशातील एकमेव चांगला व पथदर्शी प्रकल्प आहे. या प्रकल्पातून भाजीपाल्याचे अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना दिशा मिळेल. नेदरलँड्स हा भाजीपाला, दूध व फळे-फुलांसाठी प्रगत आहे. तेथील शेतकरी हिताचे तंत्रज्ञान महाराष्ट्रात वापरण्यासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करू.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार म्हणाले, की भाजीपाल्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे केंद्र मार्गदर्शक ठरेल. आज भाजीपाल्याच्या बाबतीत करार होत असला तरी भविष्यात दुधाच्या क्षेत्रातही नेदरलँड्सचे सहकार्य आपल्याला घ्यावे लागेल. तेथील गाय सरासरी ५० लिटरच्या आसपास दूध देते. आपल्याला किमान २० ते २५ लिटर दूध मिळाले तरी दूध उत्पादनात आपण अधिक प्रगती करू शकू. तेथील तंत्रज्ञान येथे आणण्याचा ट्रस्टचा यापुढील प्रयत्न राहील. यापुढील काळात केवळ शेती आणि उसावर अवलंबून न राहता भाजीपाल्यासारखे जोडधंदे करावे लागतील. शहरांमध्ये स्वच्छ व ताजा भाजीपाला लोकांना हवा आहे आणि त्यासाठी अधिक पैसे ते मोजण्यास तयार आहेत, मात्र त्यांना तो मिळत नाही, आपण तो उत्पादित करतो आहोत, मात्र बाजारापर्यंत पोचत नाही. या दोन्हीतला दुवा यापुढील काळात साधावा लागेल.

नेदरलँड्सचे कृषिमंत्री अल्ड्रेक खिअरवेल्ड यांनी कृषी शिक्षण व तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करून भारतीय कृषी क्षेत्राची गुणवत्ता व दर्जा उंचावण्यासाठी एकत्र काम करण्याचे आश्वासन या वेळी दिले. ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी प्रास्ताविकात सेंटर फॉर एक्सलन्सच्या कामकाजाचा आढावा घेत नव्या पिढीला विषमुक्त भाजीपाला देण्यासाठी असे नवे तंत्रज्ञान स्वीकारावे लागेल असे स्पष्ट केले. अशा नव्या तंत्रज्ञानासाठी सरकारी स्तरावर निधी उपलब्ध झाला पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

इतर अॅग्रो विशेष
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
सांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...
तिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...
खरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
कोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...
दुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...
‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...
मॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
गुजरातवरील ‘वायू' संकट तूर्त टळलेअहमदाबाद/ नवी दिल्ली : गुजरात किनाऱ्याच्या दिशेने...
मोगरा शेतीतून दरवळला यशाचा सुगंध...ॲग्रोवनमध्ये मोगरा शेतीची यशकथा वाचून कवठेमहांकाळ...
‘राजवाडी पॅटर्न’द्वारे शंभर एकर जमीन...पावसाळ्यात भरपूर पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे...
छत्रपती शाहू महाराज यांनी...कागल, जि. कोल्हापूर ः महाराष्ट्रात राजर्षी शाहू...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पुणे ः अरबी समुद्रात धुमाकूळ घालणाऱ्या वायू...
'पशुसंवर्धन'मध्ये अखेर नव्याने बदल्यानागपूर ः विश्‍वासात न घेताच बदल्या केल्याचा ठपका...