agriculture news in marathi, Co-operatives minister Deshmukh Inspection of Lamegawi Crops | Agrowon

सहकारमंत्र्यांकडून लांडगेवाडीच्या पिकांची पाहणी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

नांदेड ः शेतकऱ्यांनी मूग, उडीद आणि सोयाबीनची बाजारात कमी किमतीत विक्री करू नये. हमीभाव केंद्रावर शेतमाल विक्रीस न्यावा. शेतमाल तारण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

नांदेड ः शेतकऱ्यांनी मूग, उडीद आणि सोयाबीनची बाजारात कमी किमतीत विक्री करू नये. हमीभाव केंद्रावर शेतमाल विक्रीस न्यावा. शेतमाल तारण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने श्री. देशमुख यांनी गुरुवारी (ता. ११) दुपारी लांडगेवाडी (ता. लोहा) येथील मरिबा मस्के आणि किशन वलोटे यांच्या शेतातील पिकांची पाहणी केली. या वेळी आमदार प्रतापराव पाटील-चिखलीकर, तहसीलदार विठ्ठल परळीकर, तालुका कृषी अधिकारी विश्वांभर मंगनाळे, सहायक निबंधक जी. आर. कौरवार, बाजार समितीचे सचिव आनंद घोरबांड, सरपंच कलावती रामचंद्र बलोरे, शेतकरी उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले, ‘‘पीक कापणी प्रयोगाच्या वेळी शेतकरी, तसेच सरपंचांनी उपस्थित राहिले पाहिजे. पीक पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याबाबतचा अहवाल सादर करावा. बाजार समितीने शेतमाल तारण योजना राबवावी. शेतकऱ्यांनी शेतमाल तारण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. देशमुख यांनी केले. पाणीटंचाई उपायोजना आराखडा तयार करून सादर करावा, असेही त्यांनी सांगितले. श्री. देशमुख यांनी या वेळी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून आस्थेवाईकपणे विचारपूस केली. वाढीपूर्वीच वाळून गेलेल्या सोयाबीन पिकांची पाहणी केली.

इतर बातम्या
मांजरीत शेवंती दिनास प्रारंभ; १५०...पुणे : पुष्प संशोधन संचालनालयाच्या वतीने आज...
राजस्थानमध्ये सध्याचा कौल काँग्रेसच्या...जयपूर : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राजस्थान...
तेलंगणमध्ये टीआरएस, काँग्रेसमध्ये काँटे...हैदराबाद : तेलंगणमध्ये तेलंगण राष्ट्र समिती (...
छत्तीसगडमध्ये काँग्रेस आघाडीवररायपूर : छत्तीसगडमध्ये चेहरा नसतानाही काँग्रेसने...
मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये...भोपाळ : मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना आव्हान...
धुळे महापालिकेत सत्तांतर, भाजपला मोठे यशधुळे : धुळे महापालिकेत भाजपने ७४ पैकी ५० जागांवर...
खानदेशातील दूध उत्पादकांना कमी दराचा...जळगाव : खानदेशात सहकारी संघ आणि खाजगी डेअऱ्या...
खजुराच्या टाकाऊ घटकापासून वाहनांच्या...पिकांच्या अवशेषापासून वाहन व जहाज उद्योगातील अनेक...
कांद्याला हमीभाव जाहीर करण्याची मागणीधुळे : कांद्याची लागवड खानदेशात वाढत आहे....
मासेमारी व्यावसायिकांचा जलसमाधीचा...मालेगाव, जि. नाशिक : गिरणा धरणाच्या फुगवटा भागात...
कांद्याने लुटले अन्‌ कपाशीने गुंडाळलेझोडगे, जि. नाशिक : माळमाथा परिसरात कांदा व...
सोलापुरात बावीस रुपयांच्या आतच दूध दरसोलापूर : शासनाने गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर २५...
कांदा दरासाठी ‘स्वाभिमानी’चे सोलापूर...सोलापूर : कांद्याच्या घसरलेल्या दराकडे सरकार...
कोल्हापुरात दूधदरात कपात नाहीकोल्हापूर : सध्या अनुदानाच्या मुद्द्यावरून...
परभणीत दूध संकलनात वाढ; दरकपातीमुळे...परभणी ः दुष्काळी परिस्थिती तसेच शासकीय दूध...
सरकारला कृषी धोरणावरच बोलायला लावू ः...शिर्डी, जि. नगर : देश आणि राज्यातील शेतकरी अडचणीत...
धुळे जिल्ह्यात रब्बी पीककर्ज वितरण...जळगाव  ः खानदेशात खरिपात जसे बॅंकांनी...
सांगलीत अनुदान रक्कम येईपर्यंत दूधदरात...सांगली ः जिल्ह्यात सहकारी आणि खासगी असे ३५ दूध...
एफआरपीप्रमाणे ऊस बिलासाठी परभणीत शेतकरी...परभणी ः जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी ऊस...
‘महाएफपीसी’ करणार ५ हजार टन कांदा संकलनपुणे  ः कमी झालेल्या कांदा स्थिरता...