agriculture news in marathi, coalition with Shivsena is must to stop Congress | Agrowon

युती झाली नाही, तर राज्यात कॉँग्रेसची सत्ता ः महसूलमंत्री चंद्रकांत पाटील
टीम अॅग्रोवन
रविवार, 3 जून 2018

मुंबई  : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी राज्यात भाजप आणि शिवसेना या पक्षांची युती व्हायला पाहिजे, जर युती झाली नाही, तर राज्यात कॉँग्रेसची सत्ता येईल, अशी भीती राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (ता. १) व्यक्त केली.

मुंबई  : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी राज्यात भाजप आणि शिवसेना या पक्षांची युती व्हायला पाहिजे, जर युती झाली नाही, तर राज्यात कॉँग्रेसची सत्ता येईल, अशी भीती राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (ता. १) व्यक्त केली.

पालघर आणि भंडार गोंदिया येथील लोकसभांच्या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना नाराज झाली असून, शिवसेनेने भाजपवर थेट निशाणा साधला आहे. हा पक्ष सत्ता आल्यानंतर मित्रपक्षांना बाजूला करतो, असे विधान शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर बोलताना चंदाकांत पाटील यांनी राज्यात युती होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. उद्धव ठाकरे यांनी आता स्वबळावर लढण्याची भाषा केली असली आणि आतापर्यंतच्या काही निवडणूका दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढवल्या असल्या तरी यापुढील निवडणूका युतीनेच लढायला हव्यात. त्यामुळे उद्धव ठाकरे राज्याच्या अहिताचा निर्णय घेणार नाहीत, अशी आशा पाटील यांनी व्यक्त केली. 

जर युती झाली नाही, तर मात्र राज्यात राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसचे सरकार आल्यावाचून राहणार नाही, अशी कबुलीच पाटील यांनी या वेळी दिली. पाटील यांच्या या विधानामुळे त्यांनी देशभरातील पोटनिवडणुकांच्या निकालाचा धसका घेतला असावा, तसेच मोदी यांची जादू ओसरत चालल्याची भीती त्यांना सतावत असावी, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.  दरम्यान, राज्याच्या मंत्रिमंडळात सहभागी असलेल्या शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांना कोणतेही अधिकार दिले गेले नसल्याबाबत पाटील यांना विचारले असता, अशी काही स्थिती नसून, भाजपच्या राज्यमंत्र्यांना जेवढे अधिकार आहेत तेवढेच अधिकार शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

इतर ताज्या घडामोडी
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...