agriculture news in marathi, coarse cereals procurement centers status, jalgaon, maharashtra | Agrowon

जळगाव जिल्ह्यात फक्त सात खरेदी केंद्रे सुरू
टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 डिसेंबर 2017
सोयाबीनचा दर्जा हवा तसा नसल्याने त्याची खरेदी फारशी झालेली नाही. परंतु मक्‍याची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली आहे. ज्वारीची आवकही कमी होती. आणखी तीन भरडधान्य खरेदी केंद्रे सुरू केली आहेत.
- परिमल साळुंखे, पणन अधिकारी, मार्केटिंग फेडरेशन.
जळगाव ः जिल्ह्यासाठी १६ भरडधान्य केंद्रे मंजूर आहेत, परंतु गुरुवारपर्यंत (ता. ७) फक्त सातच केंद्रे सुरू झाली. त्यातच बाजरीची खरेदी या केंद्रांवर झालेली नाही. फक्त ज्वारी व मका खरेदी झाल्याची माहिती मिळाली. शुक्रवारी (ता. ८) पारोळा व भडगाव केंद्रे सुरू झाली, तर शनिवारी (ता. ९) चाळीसगाव येथील भरडधान्य खरेदी केंद्र सुरू होणार असल्याची माहिती मिळाली. 
 
जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून भरडधान्य खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले होते. परंतु २० नोव्हेंबरपर्यंत फक्त पाच केंद्रे सुरू झाली. त्यानंतर दोन केंद्र सुरू झाली. सद्यःस्थितीत चोपडा, भुसावळ, अमळनेर, जामनेर, मुक्ताईनगर, बोदवड व रावेर येथील भरडधान्य खरेदी केंद्र सुरू आहेत.
 
या सर्व केंद्रांमध्ये बाजरीची कुठलीही आवक झालेली नाही. ज्वारीची एकूण ५५८ आणि मक्‍याची एकूण ७३७ क्विंटल खरेदी झाली आहे. चाळीसगाव, भडगाव, पारोळा येथे भरडधान्य खरेदी केंद्रे सुरू करण्याच्या हालचाली झाल्या; परंतु यावल, जळगाव, एरंडोल, धरणगाव आदी पाच तालुक्‍यांमध्ये केंद्रे सुरूच झालेले नाहीत. जिल्ह्यात बाजरीची हवी तेवढी पेरणी नव्हती. त्यामुळे बाजरीची कुठलीही आवक झालेली नसल्याचे स्पष्टीकरण मार्केटिंग फेडरेशनने दिले आहे. 
 
जिल्ह्यात १ नोव्हेंबरपर्यंत पाचोरा, जळगाव व अमळनेर येथे कडधान्य खरेदी केंद्र सुरू झाले. यात सोयाबीनची अल्प म्हणजेच फक्त ३०० क्विंटल खरेदी झाली आहे. तर तिन्ही केंद्रांवर उडदाची मिळून पाच हजार ७७, मुगाची २६१२ क्विंटल खरेदी झाल्याची माहिती मिळाली. कडधान्य खरेदीची मुदत संपत  आली असूून, येत्या १३ डिसेंबरपर्यंत ही खरेदी सुरू राहणार आहे. सोयाबीनची खरेदी १३ जानेवारी २०१८ पर्यंत केली जाईल, अशी माहिती मिळाली.
 

इतर बातम्या
प्रकल्पग्रस्त वयोवृद्ध शेतकऱ्याचा...मुंबई : धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या...
कोरडवाहू शेतजमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची...सोलापूर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत...
हिरव्या मिरचीच्या दरात जळगावात सुधारणाजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शेतकरी कन्या झाली उत्पादन शुल्क निरीक्षकयवतमाळ : इंजिनिअर होऊन प्रशासकीय सेवेत आपले...
‘गिरणा’तून दुसरे आवर्तन सुरू पण... जळगाव  ः जिल्ह्यातील शेतीसाठी महत्त्वपूर्ण...
मातीच्या ऱ्हासासोबत घडले प्राचीन...महान मानल्या जाणाऱ्या अनेक प्राचीन संस्कृतींचा...
अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी सूचना...मुंबई : शासनाच्या ध्येय-धोरणांचे प्रतिनिधीत्व...
विनापरवाना गाळप करणाऱ्या साखर...पुणे : राज्यात विनापरवाना गाळप करणाऱ्या साखर...
माफसूला जागतिक स्तरावर लौकिक मिळवून...नागपूर : पदभरती, ॲक्रीडेशन यासारखी आव्हाने...
कर्जमाफीची रक्कम द्या; अन्याथ लेखी द्यापुणे : २००८ मधील कर्जमाफीची रक्कम नाबार्डने...
नुकसानभरपाईची मागणी तथ्यांवर आधारित...नागपूर : नॅशनल सीड असोसिएशनने बोंड अळीला...
बदल्यांअभावी राज्यात कृषी... नागपूर : राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कृषी...
भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे ७३ टक्के...दावोस  ः गेल्या वर्षभरात देशात निर्माण...
हवामान बदलाचा सांगलीतील द्राक्ष बागांना... सांगली  ः गेल्या दोन दिवसांपासून हवामानात...
साताऱ्यातील चौदाशेवर शेतकरी ठिबक...सातारा : जिल्ह्यातील २०१६-१७ मध्ये चौदाशेवर...
किमान तापमानात घट; नगर ९.४ अंशांवरपुणे ः विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात...
सोलापूर बाजारात कांद्याच्या दरात पुन्हा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रब्बी पेरणीत बुलडाण्याची आघाडी अकोला  ः अमरावती विभागात यंदाच्या रब्बी...
कोल्हापुरात हिरवी मिरची तेजीतकोल्हापूर : येथील बाजारसमितीत या सप्ताहात हिरवी...
नागपुरात तुरीच्या दरात घसरणनागपूर : येथील कळमणा बाजारात आठवड्याच्या...