agriculture news in marathi, Coarse prices up to 5000, good demand for indigenous varieties | Agrowon

तुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना चांगली मागणी
टीम अॅग्रोवन
रविवार, 16 डिसेंबर 2018

आमच्या भागात तूर मळणीवर आहे. बागायती तूर अधिक असून, उत्पादन यंदा बरे येईल; परंतु दर समाधानकारक दिसत नाहीत. यामुळे शासकीय खरेदीसंबंधी तयारी करावी. 
                                                              - विशाल महाजन, तूर उत्पादक, नायगाव,

जि. जळगाव

जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली आहे. तुरीला प्रतिक्विंटल ५००० रुपयांपर्यंतचा दर काही ठिकाणी मिळत आहे. काही मोठ्या गावांमध्ये देशी वाणांच्या तुरीला चांगली मागणी आहे. 

तुरीला ५६७५ रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव आहे. एवढे दर मिळावेत. तसेच शासनाने तूर खरेदी केंद्र तातडीने सुरू करावेत, अशी मागणी केली जात आहे. 

खानदेशात सुमारे नऊ हजार हेक्‍टरवर तुरीची लागवड विविध तालुक्‍यांमध्ये झाली होती. यात बागायती किंवा सिंचनाची सुविधा असलेल्या तुरीचे क्षेत्र सुमारे चार हजार हेक्‍टरपर्यंत आहे. मुक्ताईनगर, रावेर, चोपडा, शहादा, तळोदा भागात अनेक शेतकरी तुरीची लागवड करतात. ही लागवड यंदा कमी असली तरी उत्पादन बऱ्यापैकी येईल, अशी स्थिती आहे. संकरित तुरीची लागवड अधिक आहे, तर अनेक शेतकऱ्यांनी देशी किंवा पारंपरिक वाणांची लागवड जूनमध्येच केली होती. या तुरीची मळणी काही ठिकाणी सुरू झाली आहे. 

उत्पादकता अजून नेमकेपणाने समोर आलेली नाही. कारण कोरडवाहू तुरीची मळणी जानेवारीच्या मध्यात होईल. ही मळणी शहादा, मुक्ताईनगर व रावेरातील काही भागात झाली आहे; परंतु तुरीचे दर दबावात दिसत आहेत. मागील हंगामात तुरीला ४००० रुपयांपर्यंतचे दर होते. काही ठिकाणी तर ३५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. यंदा देशी वाणांच्या तुरीला उठाव आहे. पाच हजारांपर्यंतचा दर तूर्ततरी आहे; परंतु पुढे आवक वाढली तर दरांवर दबाव वाढू शकतो. त्यापूर्वीच तुरीच्या शासकीय खरेदीसंबंधी कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. 

इतर ताज्या घडामोडी
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...
दक्षिण महाराष्ट्रात पक्षांपेक्षा ‘...कोल्हापूर: राज्याच्या इतर भागांप्रमाणे दक्षिण...
पिनाकीचंद्र घोष लोकपालपदीनवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह नवे नौदलप्रमुखनवी दिल्ली: व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह यांची भारतीय...
हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस...बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या...
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...