औरंगाबादेत काकडी १२०० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटल

औरंगाबादेत काकडी १२०० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटल
औरंगाबादेत काकडी १२०० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटल

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १३) काकडीची ६० क्‍विंटल आवक झाली. तिला १२०० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची १८० क्‍विंटलची आवक झाली. तिला ४००० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ४६७ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याचे दर १०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २४१ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला ४०० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. वांग्याची आवर ३३ क्‍विंटल, तर दर १००० ते १६०० रुपये, गवारची आवक २४ क्‍विंटल, तर दर २००० ते ६०००, भेंडीची आवक ३५ क्‍विंटल, तर दर १६०० ते ३२००, वालशेंगांची आवक ३ क्‍विंटल,  तर दर ३००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा राहिला. ५ क्‍विंटल आवक झालेल्या लिंबूला ४००० ते ६००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ६ क्‍विंटल आवक झालेल्या कारल्याचे दर ५००० ते ६००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.

पत्ताकोबीची आवक २१६ क्‍विंटल, तर दर ७०० ते ९०० रुपये, फ्लाॉवरची आवक ३५ क्‍विंटल, तर दर २००० ते २५०० रुपये, ढोबळ्या मिरचीची आवक २२ क्‍विंटल, तर दर ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २८ क्‍विंटल आवक झालेल्या शेवग्याचे दर ६०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ३७ क्‍विंटल आवक झालेल्या गाजराला ५०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १२५ क्‍विंटल आवक झालेल्या कैऱ्याचे दर २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.

आठ क्‍विंटल आवक झालेल्या दिलपसंदला दर २५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ४५०० जुड्यांची आवक झालेल्या मेथीला १००० ते १५०० रुपये प्रती शेकड्याचा दर मिळाला. पालकची आवक ६५०० जुड्या तर दर ५०० ते १००० रुपये प्रतिशेकडा राहिले. १३ हजार जुड्यांची आवक झालेल्या कोंथिबिरीला ४०० ते १२०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

वाण आवक क्‍विंटलमध्ये दर प्रतिक्‍विंटल
मोसंबी १५ २५०० ते ४५००
संत्रा ३३ २००० ते ३५००
आंबा २३ ५०००ते ८०००
द्राक्ष ३५ ३००० ते ५०००
डाळिंब १२७ ३०० ते २५००
खरबूज १३० १२०० ते १८००
टरबूज २७५ ६०० ते १२००
पपई २० ३०० ते ५००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com