जगातील कॉफी उत्पादनात वाढ

काॅफी
काॅफी

नवी दिल्ली ः जगातील कॉफी उत्पादनात दीड टक्क्याने वाढ होणार अाहे. जगातील २०१६-१७ या वर्षातील कॉफी उत्पादन १५३.९ दशलक्ष पिशव्यांवर (एक पिशवी १६० किलो) पोचेल, असा अंदाज अांतरराष्ट्रीय काॅफी संघटनेने व्यक्त केला अाहे.

याअाधी १५१.६ दशलक्ष पिशव्या कॉफी उत्पादन होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात अाला होता; मात्र इंडोनेशियातील कॉफी उत्पादन वाढणार अाहे. यामुळे जगातील कॉफी उत्पादनात वाढ होणार असल्याचे अांतरराष्ट्रीय कॉफी संघटनेने सुधारित अंदाज अहवालात नमूद केले अाहे.

अरेबिका कॉफीचे उत्पादन १०.२ टक्क्यांनी वाढून ९७.३ दशलक्ष पिशव्या होईल; मात्र रोबस्टा काॅफीचे उत्पादन १०.६ टक्क्यांनी घटण्याची शक्यता अाहे. या काॅफीचे उत्पादन ५६.६ दशलक्ष पिशव्या होण्याचा अंदाज अाहे. ब्राझीलमध्ये २०१७-१८ या वर्षातील काॅफीचे उत्पादन घटण्याची शक्यता अाहे. या पार्श्वभूमीवर जगातील काॅफीचे दर जुलैमध्ये वाढले होते. काॅफीचे दर सरासरी ४ टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती काॅफी संघटनेने दिली अाहे. कॉफी निर्यातीत साडेपाच टक्क्यांनी वाढ गेल्या जूनमध्ये कॉफीच्या निर्यातीत ५.७ टक्क्यांनी वाढ झाली होती. २०१६-१७ मधील पहिल्या नऊ महिन्यातील जगातील एकूण कॉफी निर्यात ९२.३ दशलक्ष पिशव्यांवर पोचली अाहे. याअाधीच्या वर्षाच्या तुलनेत कॉफी निर्यातीत ५.६ टक्के वाढ झाली असल्याचे काॅफी संघटनेने म्हटले अाहे. भारतातील काॅफी उत्पादनातही घट भारतात २०१६-१७ मध्ये ३,१६,७०० मेट्रिक टन कॉफी उत्पादनाचा अंदाज भारतीय काॅफी मंडळाने व्यक्त केला अाहे. २०१५-१६ मध्य देशात ३,४८,००० मेट्रिक टन उत्पादन झाले होते. कमी पाऊस अाणि वाढत्या तापमानामुळे देशातील अपेक्षित उत्पादनात घट होणार असल्याचे कॉफी मंडळाने म्हटले अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com