agriculture news in marathi, cofusing situation in rashtrawadi congress party for south nagar seat, nagar, maharashtra | Agrowon

दक्षिण नगरच्या जागेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ताळमेळ दिसेना
टीम अॅग्रोवन
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

नगर   ः दक्षिण लोकसभा मतदारसंघाची (नगर) जागा काँग्रेसला द्यावी आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीला द्यावी, असे मी राष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठांना बैठकीत सांगितले आहे, असे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले होते. मात्र अभंग यांच्या वक्तव्याला अजिबात किंमत नाही, दक्षिणेची जागा राष्ट्रवादीने लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असे राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक अंकुश काकडे यांनी शुक्रवारी (ता. ७) स्पष्ट केले.

नगर   ः दक्षिण लोकसभा मतदारसंघाची (नगर) जागा काँग्रेसला द्यावी आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीला द्यावी, असे मी राष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठांना बैठकीत सांगितले आहे, असे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले होते. मात्र अभंग यांच्या वक्तव्याला अजिबात किंमत नाही, दक्षिणेची जागा राष्ट्रवादीने लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असे राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक अंकुश काकडे यांनी शुक्रवारी (ता. ७) स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या दक्षिणेच्या जागेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ताळमेळ नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

नगर लोकसभा मतदार संघ (दक्षिण) राष्ट्रवादीकडे आहे. मात्र येथून लढण्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव, डॉ. सुजय विखे पाटील इच्छुक आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी ‘दक्षिण आमच्याकडे राहील, आम्ही लढवणार’, असे स्पष्ट केलेले आहे.

अभंग यांच्या वक्‍तव्यावर मात्र शुक्रवारी अंकुश काकडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जागा बदल, उमेदवारी देण्याचा निर्णय ज्येष्ठ नेते शरद पवार घेतात. त्यामुळे अभंग यांच्या वक्तव्याला अजिबात किंमत नाही. त्यांनी पक्षाच्या बैठकीत असा कोणताही मुद्दा मांडलेला नाही.  याआधी आमदार राहुल जगताप यांनीही असे वक्तव्य केले होते. पक्षाचा विषय असा जाहीर बोलू नये अशी समज दिली आहे. अभंग यांच्या वक्तव्यानंतर लगेचच काकडे यांनी स्पष्टीकरण दिल्याने दक्षिणेच्या जागेबाबत राष्ट्रवादीत ताळमेळ नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

`कार्यकर्त्यांचीच आहे इच्छा`
अंकुश काकडे म्हणाले, की नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा दोन वेळा पराभव झाला. याचा अर्थ येथे ताकद नाही असा होत नाही. चंद्रशेखर घुले, प्रताप ढाकणे, दादाभाऊ कळमकर, गडाखही इच्छुक आहेत.  राष्ट्रवादीकडे दक्षिण लोकसभेसाठी सक्षम उमेदवार आहे. अभंग व राहुल जगताप वगळता दक्षिणेची जागा लढवावी राष्ट्रवादीने लढवावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...