agriculture news in Marathi, cold increased in state, Maharashtra | Agrowon

राज्यात गारठा वाढू लागला
कोजेन्सिस वृत्तसेवा
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

पुणे : किमान तापमान सरासरीच्या खाली घसरल्याने राज्यात गारठा वाढू लागला आहे. दिवसाचे तापमानाही कमी होण्यास सुरवात झाली आहे. सोमवारी (ता. २९) नाशिक येथे नीचांकी १३.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून नगर, परभणीमध्ये थंडी वाढली आहे. राज्यात किमान तापमानात घट होणार असून, मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

पुणे : किमान तापमान सरासरीच्या खाली घसरल्याने राज्यात गारठा वाढू लागला आहे. दिवसाचे तापमानाही कमी होण्यास सुरवात झाली आहे. सोमवारी (ता. २९) नाशिक येथे नीचांकी १३.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून नगर, परभणीमध्ये थंडी वाढली आहे. राज्यात किमान तापमानात घट होणार असून, मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

ऑक्टोबर महिन्यात राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने चटका असह्य झाला आहे. तापमानाचा पारा उच्चांकी ३८ अंशांपर्यंत पोचला. अनेक ठिकाणी तापमान सातत्याने ३५ अंशांच्या वर गेले होते. मात्र मागील आठवड्यापासून उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह राज्याच्या दिशेने येऊ लागल्याने कमाल आणि किमान तापमानात हळूहळू घट होत आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात तापमान बहुतांशी ठिकाणी ३३ अंशांपर्यंत, तर मराठवाड्यात ३४ अंशांपर्यंत खाली आले, तर कोकणात मात्र तापमानाचा पारा चढलेला असल्याचे दिसून येते. नगर येथे १३.८, परभणी येथे १३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

बंगालच्या उपसागरात आज (ता. ३०) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहे. उपसागरात ढगांची दाटी झाली असून, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्‍चिम बंगालमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे, तर तमिळनाडू, केरळ, कर्नाटकमध्ये गुरुवारपासून ईशान्य मॉन्सून सक्रिय होणार असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

सोमवारी (ता.२९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, किमान (कंसात) तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३३.६ (१४.१), नगर- (१३.८), जळगाव- ३६.४ (१५.६), कोल्हापूर- ३२.३ (१९.४), महाबळेश्‍वर- २७.५ (१६.२), मालेगाव- ३५.६ (१९.०), नाशिक- ३३.७ (१३.३), सांगली- ३३.२ (१६.८), सातारा- ३२.३(१६.६), सोलापूर- ३४.४ (१८.१), सांताक्रुझ- ३८.० (२१.८), अलिबाग- ३६.२ (२१.९), रत्नागिरी- ३६.५ (२१.४), डहाणू- ३७.० (२१.७), आैरंगाबाद- ३४.०(१५.२), परभणी- ३४.९ (१३.८), नांदेड- ३४.०(१७.५), उस्मानाबाद- ३३.१ (१६.६), अकोला- ३५.८ (१७.७), अमरावती- ३४.१(१८.२), बुलडाणा- ३३.० (१७.४), चंद्रपूर- ३३.८(२८.६), गोंदिया- ३२.८ (१५.९), नागपूर- ३५.५(१४.४), वर्धा- ३३.०(१५.५), यवतमाळ- ३३.० (१५.५).

इतर अॅग्रो विशेष
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
सांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...
तिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...
खरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
कोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...
दुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...
‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...
मॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
गुजरातवरील ‘वायू' संकट तूर्त टळलेअहमदाबाद/ नवी दिल्ली : गुजरात किनाऱ्याच्या दिशेने...
मोगरा शेतीतून दरवळला यशाचा सुगंध...ॲग्रोवनमध्ये मोगरा शेतीची यशकथा वाचून कवठेमहांकाळ...
‘राजवाडी पॅटर्न’द्वारे शंभर एकर जमीन...पावसाळ्यात भरपूर पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे...
छत्रपती शाहू महाराज यांनी...कागल, जि. कोल्हापूर ः महाराष्ट्रात राजर्षी शाहू...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पुणे ः अरबी समुद्रात धुमाकूळ घालणाऱ्या वायू...
'पशुसंवर्धन'मध्ये अखेर नव्याने बदल्यानागपूर ः विश्‍वासात न घेताच बदल्या केल्याचा ठपका...