agriculture news in Marathi, cold increased in state, Maharashtra | Agrowon

राज्यात हुडहुडी वाढली...
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात हुडहुडी वाढली आहे. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर नगर येथे नीचांकी ११.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. राज्यात थंडी वाढणार असून, कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात हुडहुडी वाढली आहे. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर नगर येथे नीचांकी ११.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. राज्यात थंडी वाढणार असून, कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये दोन दिवसांपासून नीचांकी तापमानाची नोंद होत आहे. मंगळवारी (ता. १३) यंदाच्या हंगामातील नीचांकी ९.५ अंश सेल्सिअस तापमानाची, तर बुधवारी १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचे विद्यापीठाचे कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलाश डाखोरे यांनी सांगितले. परभणी शहरामध्ये १३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

राज्यात निरभ्र आकाश असून, थंडी वाढतच आहे. दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा ३० ते ३५ अंशांच्या दरम्यान असून, जळगाव येथे उच्चांकी ३५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुणे, जळगाव, नाशिक, सांगली, सातारा, औरंगाबाद, परभणी, अकोला, नागपूर, वर्धा येथे रात्रीचे तापमान १३ अंशांच्या आसपास आल्याने हुडहुडी जाणवू लागली आहे.

बुधवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, किमान (कंसात) तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३२.६ (१३.७), नगर - (११.१), जळगाव ३५.४ (१२.६), कोल्हापूर ३१.० (१७.५), महाबळेश्‍वर २७.८ (१५.९), मालेगाव ३३.२ (१५.८), नाशिक ३२.५ (१२.३), सांगली ३१.४ (१३.३), सातारा ३२.७ (१३.९), सोलापूर ३४.३ (१४.२), सांताक्रूझ ३२.८ (२०.४), अलिबाग ३१.५ (२१.३), रत्नागिरी ३५.५ (१९.०), डहाणू ३२.९ (२०.४), आैरंगाबाद ३२.० (१२.६), परभणी ३३.७ (१३.०), नांदेड ३५.० (१४.०), उस्मानाबाद -(१६.३), अकोला ३५.३ (१३.८), अमरावती ३३.० (१५.६), बुलडाणा ३३.२ (१५.३), चंद्रपूर ३३.० (१६.४), गोंदिया ३१.६ (१४.२), नागपूर ३३.५ (१२.०), वर्धा ३३.२ (१३.४).

इतर अॅग्रो विशेष
परभणीत मुगाची चार क्विंटल, तर उडदाची...परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील मुगाची...
कृषीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश... पुणे ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये...
दर कपातीने दूध उत्पादक मेटाकुटीसपुणे ः शासनाने गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर २५...
‘ईपीआर’ कंपन्यांच्या भल्यासाठी दूध...पुणे : पॉलिथिन फिल्मचे पुनर्चक्रण करणाऱ्या काही '...
जिद्द दुष्काळातही गोड पेरू पिकवण्याची...पुणे जिल्ह्यात शिरूर या कायम दुष्काळी तालुक्यातील...
सुधारीत तंत्राने तरारला दर्जेदार भुईमूग तुळ्याचा पाडा (जि. पालघर) येथील आर्थिकदृष्ट्या...
विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे ः मध्य महाराष्ट्राच्या परिसरात चक्राकार...
दुष्काळी भागात चारा छावण्या ः चंद्रकांत...मुंबई : राज्यातील दुष्काळी भागात गरज आणि...
कृषिकेंद्रित ग्रामविकासाची पायाभरणी! स्वातंत्र्योत्तर कालखंडापासून भारतीय कृषी...
जाणिवेचा दुष्काळ नको राज्य शासनाने दुष्काळ जाहीर...
वृक्ष होऊन जगू यामागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम...
एकत्र या, निर्यात वाढेलकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल...
राज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश... पुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये...
रोजगाराच्या शोधात गेलेल्या १२ जणांचा...महागाव, जि. यवतमाळ : कापूस वेचणीसाठी गेलेल्या...
देशभरात ४१४ लाख हेक्टरवर रब्बी पेरणी नवी दिल्ली ः देशात अनेक ठिकाणी दुष्काळी...
संत्रा बाग छाटणी सयंत्र ठरतेय केवळ...नागपूर ः शेतकऱ्यांना पूरक तंत्रज्ञान देण्यात...
होय... सरकीपासून चॉकलेट, कुकीज नागपूर : सरकीपासून ढेप आणि तेल मिळते ही झाली...
पीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...
विदर्भात गारपिटीचा अंदाजपुणे : पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे...
गाळपेर क्षेत्रातून उपलब्ध होणार ३४ लाख...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...