agriculture news in Marathi, cold increased in state; Nashik at 11.5 Celsius, Maharashtra | Agrowon

राज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवर
टीम अॅग्रोवन
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे येऊ लागल्याने राज्यात गारठा वाढला आहे. मंगळवारी (ता. १३) सकाळी नाशिक येथे राज्यातील नीचांकी ११.५ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद झाली. राज्यात शनिवारपर्यंत (ता. १७) मुख्यत: कोरडे हवामान राहणार असून, पहाटेच्या वेळी गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे येऊ लागल्याने राज्यात गारठा वाढला आहे. मंगळवारी (ता. १३) सकाळी नाशिक येथे राज्यातील नीचांकी ११.५ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद झाली. राज्यात शनिवारपर्यंत (ता. १७) मुख्यत: कोरडे हवामान राहणार असून, पहाटेच्या वेळी गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

राज्यात अनेक ठिकाणी रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या खाली आले अाहे. विदर्भात किमान तापमानाचा पारा ११.६ ते १५.८ अंश, मराठवाड्यात १२.४ ते १५.४ अंश, मध्य महाराष्ट्रात १२ ते १८.४ अंश आणि कोकणात १९.३ ते २०.५ अंशांच्या दरम्यान अाहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे मध्य प्रदेशातील मंदला येथे देशातील नीचांकी ६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, महाराष्ट्राच्या तापमानातही घट होत आहे. पुढील काळात थंडी आणखी वाढणार अाहे.

मंगळवारी (ता.१३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, किमान (कंसात) तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३२.६ (१२.९), जळगाव ३४.२ (१२.०), कोल्हापूर ३१.५ (१८.४), महाबळेश्‍वर २७.६ (१६.२), मालेगाव ३३.२ (१४.८), नाशिक ३२.४ (११.५), सांगली ३२.८ (१३.९), सातारा ३२.५ (१३.४), सोलापूर ३४.१ (१४.८), सांताक्रूझ ३५.४ (२०.०), अलिबाग ३३.० (२०.५), रत्नागिरी ३५.८ (१९.३), डहाणू ३४.२ (१९.८), आैरंगाबाद ३३.४ (१२.४), परभणी ३३.९  (१२.४), नांदेड ३५.०, उस्मानाबाद -(१५.४), अकोला ३४.१ (१४.१), अमरावती ३३.६ (१४.६), बुलडाणा ३२.४ (१५.२), चंद्रपूर ३३.६ (१५.८), गोंदिया ३१.४ (१३.६), नागपूर ३२.९ (११.६), वर्धा ३१.२ (१३.७), यवतमाळ ३३.५ (१३.४).

पूर्व किनाऱ्याला ‘गाजा’चा धोका कायम
बंगालच्या उपसागरात घोंगावणारे ‘गाजा’ चक्रीवादळ मंगळवारी सकाळी ८.३० वाजता चेन्नईपासून ७४० किलोमीटर, तर नागपट्टनमपासून ८३० किलोमीटर ईशान्य दिशेला समुद्रात होते. चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, गुरुवारी (ता.१५) तमिळनाडूच्या पूर्व किनाऱ्यावरील कुड्डालोर आणि पाम्बनलगत धडकण्याचे संकेत अाहेत. दक्षिण आंध्र प्रदेश तमिळनाडू, रायलसीमा, दक्षिण कर्नाटक आणि केरळमध्ये शुक्रवारपर्यंत (ता. १६) जोरदार पाऊस पडणार आहे. शनिवारी ही प्रणाली अरबी सुमद्राकडे सरकणार आहे. चक्रीवादळामुळे ताशी १०० ते ११० किलोमीटर वेगाने चक्राकार वारे वाहणार असून, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूच्या किनाऱ्यालगतच्या समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

इतर अॅग्रो विशेष
वृक्ष होऊन जगू यामागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम...
एकत्र या, निर्यात वाढेलकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल...
राज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश... पुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये...
रोजगाराच्या शोधात गेलेल्या १२ जणांचा...महागाव, जि. यवतमाळ : कापूस वेचणीसाठी गेलेल्या...
देशभरात ४१४ लाख हेक्टरवर रब्बी पेरणी नवी दिल्ली ः देशात अनेक ठिकाणी दुष्काळी...
संत्रा बाग छाटणी सयंत्र ठरतेय केवळ...नागपूर ः शेतकऱ्यांना पूरक तंत्रज्ञान देण्यात...
होय... सरकीपासून चॉकलेट, कुकीज नागपूर : सरकीपासून ढेप आणि तेल मिळते ही झाली...
पीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...
विदर्भात गारपिटीचा अंदाजपुणे : पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे...
गाळपेर क्षेत्रातून उपलब्ध होणार ३४ लाख...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
कपाळावर कंकू नसेल; पण मनगटात ताकद आहे...शेतकरी मोर्चाच्या बॅनरपासून ते पहिल्या रांगेत...
जिवापाड जपलेल्या बागा आता जगवाव्यात कशा?नगर ः पाणी उपलब्ध नसल्याने फळबागा अडचणीत आल्या...
भातपीक करते शेतातून वाहणाऱ्या पाण्याचे...सध्या पाण्याच्या प्रवाहातून येणाऱ्या घटकांमुळे...
'फरदड'मुक्तीसाठी राज्यात २१ हजार...पुणे : राज्यात कपाशीचे उत्पादन घेणाऱ्या २१ हजार...
बोगस मिश्रखत विक्री प्रकरणी कंपनीमालक,...पुणे : शेतकऱ्यांना बोगस मिश्रखताचा पुरवठा...
शेडनेट, पॉलिहाउससाठी एक एकरापर्यंत...पुणे : हरितगृह, पॉलिहाउसला मागणी वाढत असल्याने...
दुष्काळ सहनशील १८ ऊस वाणांची चाचणीनवी दिल्ली ः महाराष्ट्रासाठी कमी पाण्यावर...
कर्जमाफीचे सतरा हजार कोटी शेतकऱ्यांच्या...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विदर्भात पावसाचा अंदाजपुणे: मध्य महाराष्ट्रात असलेल्या द्रोणीय...
सोलापूरच्या शेतकऱ्याची सांगलीत...सांगली : डाळिंब घ्या... डाळिंब, शंभर रुपयाला चार...