agriculture news in Marathi, cold at Nagpur and Gondia, Maharashtra | Agrowon

नागपूर, गोंदिया गारठले
टीम अॅग्रोवन
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

पुणे : उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात थंडीने हात-पाय पसरण्यास सुरवात केली आहे. विदर्भाच्या किमान तापमानात मोठी घट झाली आहे. रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा ५ अंशांनी खाली उतरल्याने नागपूर, गोंदिया गारठले आहे. नागपूर येथे यंदाच्या हंगामातील नीचांकी ११.६ अंश सेल्सिअस तापमानाची तर गोंदिया येथे १२.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 

पुणे : उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात थंडीने हात-पाय पसरण्यास सुरवात केली आहे. विदर्भाच्या किमान तापमानात मोठी घट झाली आहे. रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा ५ अंशांनी खाली उतरल्याने नागपूर, गोंदिया गारठले आहे. नागपूर येथे यंदाच्या हंगामातील नीचांकी ११.६ अंश सेल्सिअस तापमानाची तर गोंदिया येथे १२.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 

राज्यात निरभ्र आकाश असल्याने दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढत आहे. अनेक ठिकाणी कमाल तापमान ३३ अंशांच्या वर असून, सांताक्रूझ येथे ३५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर विदर्भ, मराठवाड्यात रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या खाली उतरले आहे. तर उर्वरीत राज्यातील किमान तापमानात घट होत असल्याने राज्यात थंडी वाढू लागली आहे. नागपूर, गोंदियासह जळगाव, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अकोला, वर्धा, यवतमाळ येथे तापमानाचा पारा १५ अंशांपर्यंत खाली उतरला आहे.

रविवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, किमान (कंसात) तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३३.६(१५.०), जळगाव ३५.५(१४.६), कोल्हापूर ३२.१ (२०.८), महाबळेश्‍वर २७.१(१६.२), मालेगाव ३४.२ (१६.४), नाशिक ३२.९(१३.६), सांगली ३३.४(१८.१), सातारा ३२.५(१६.७), सोलापूर ३४.७(१९.४), सांताक्रूझ ३५.४(२०.४), अलिबाग ३२.५(२१.१), रत्नागिरी ३४.६(२२.२), डहाणू ३२.२(२०.९), आैरंगाबाद ३३.६(१३.६), परभणी ३५.४ (१४.७), नांदेड ३५.०(१६.५), उस्मानाबाद ३३.५ (१६.९), अकोला ३४.६(१४.९), अमरावती ३३.४(१६.२), बुलडाणा २९.३ (१६.४), चंद्रपूर ३४.६(१८.२), गोंदिया ३०.८(१२.९), नागपूर ३३.०(११.६), वर्धा ३३.५(१४.०), यवतमाळ ३४.५ (१५.०).

बंगालच्या उपसागरात ‘गाजा’ चक्रीवादळ
बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूलगतच्या समुद्रात ‘गाजा’ चक्रीवादळ घोंघावत आहे. चेन्नईपासून ९३० किलोमीटर, तर श्रीहरीकोटापासून ९८० किलोमीटर आग्नेय दिशेला असलेली ही प्रणाली तमिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे झेपावत आहे. आज (ता. १२) या चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढणार असून, ताशी १०० ते ११० किलोमीटर वेगाने चक्राकार वारे वाहणार आहे. पूर्व किनाऱ्यावर जोरदार पावसाची शक्यता असून, समुद्रही खवळण्याचा इशारा देण्यात आला आहे.

इतर अॅग्रो विशेष
वृक्ष होऊन जगू यामागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम...
एकत्र या, निर्यात वाढेलकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल...
राज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश... पुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये...
रोजगाराच्या शोधात गेलेल्या १२ जणांचा...महागाव, जि. यवतमाळ : कापूस वेचणीसाठी गेलेल्या...
देशभरात ४१४ लाख हेक्टरवर रब्बी पेरणी नवी दिल्ली ः देशात अनेक ठिकाणी दुष्काळी...
संत्रा बाग छाटणी सयंत्र ठरतेय केवळ...नागपूर ः शेतकऱ्यांना पूरक तंत्रज्ञान देण्यात...
होय... सरकीपासून चॉकलेट, कुकीज नागपूर : सरकीपासून ढेप आणि तेल मिळते ही झाली...
पीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...
विदर्भात गारपिटीचा अंदाजपुणे : पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे...
गाळपेर क्षेत्रातून उपलब्ध होणार ३४ लाख...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
कपाळावर कंकू नसेल; पण मनगटात ताकद आहे...शेतकरी मोर्चाच्या बॅनरपासून ते पहिल्या रांगेत...
जिवापाड जपलेल्या बागा आता जगवाव्यात कशा?नगर ः पाणी उपलब्ध नसल्याने फळबागा अडचणीत आल्या...
भातपीक करते शेतातून वाहणाऱ्या पाण्याचे...सध्या पाण्याच्या प्रवाहातून येणाऱ्या घटकांमुळे...
'फरदड'मुक्तीसाठी राज्यात २१ हजार...पुणे : राज्यात कपाशीचे उत्पादन घेणाऱ्या २१ हजार...
बोगस मिश्रखत विक्री प्रकरणी कंपनीमालक,...पुणे : शेतकऱ्यांना बोगस मिश्रखताचा पुरवठा...
शेडनेट, पॉलिहाउससाठी एक एकरापर्यंत...पुणे : हरितगृह, पॉलिहाउसला मागणी वाढत असल्याने...
दुष्काळ सहनशील १८ ऊस वाणांची चाचणीनवी दिल्ली ः महाराष्ट्रासाठी कमी पाण्यावर...
कर्जमाफीचे सतरा हजार कोटी शेतकऱ्यांच्या...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विदर्भात पावसाचा अंदाजपुणे: मध्य महाराष्ट्रात असलेल्या द्रोणीय...
सोलापूरच्या शेतकऱ्याची सांगलीत...सांगली : डाळिंब घ्या... डाळिंब, शंभर रुपयाला चार...