agriculture news in Marathi, cold in Nashik, Nagar and pune, Maharashtra | Agrowon

नाशिक, नगर, पुण्यात गारठा वाढला
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

पुणे : उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे नाशिक, नगर, पुणे येथे गारठा वाढला आहे. बुधवारी (ता. ३१) नाशिक येथे राज्यातील नीचांकी १३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पावसाला पोषक हवामान हाेत असल्याने शनिवारपासून (ता. ३) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पुणे : उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे नाशिक, नगर, पुणे येथे गारठा वाढला आहे. बुधवारी (ता. ३१) नाशिक येथे राज्यातील नीचांकी १३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पावसाला पोषक हवामान हाेत असल्याने शनिवारपासून (ता. ३) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

उत्तरेकडील थंड हवेचे प्रवाह वाढले असून, दुपारच्या वेळीही गार वारे वाहत असल्याने उन्हाचा चटका कमी झाला आहे. नाशिकसह नगर, पुण्यात तापमान १४ अंशांच्या खाली आल्याने थंडी वाढली आहे. कोकण वगळता राज्याच्या कमाल तापमानातही घट होेत अाहे. डहाणू येथे राज्यातील उच्चांकी ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

दक्षिण कर्नाटक आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ४.५ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असल्याने राज्याच्या दक्षिण भागातही पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. शनिवारी (ता. ३) आणि रविवारी (ता. ४) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

बुधवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.१.(१३.८), नगर - (१३.८), जळगाव ३३.६ (१७.०), कोल्हापूर ३०.१ (१७.४), महाबळेश्‍वर २६.१ (१४.६), मालेगाव ३५.२ (१७.४), नाशिक ३०.७ (१३.५), सांगली ३२ (१४.४), सातारा ३०.२ (१६.२), सोलापूर ३३.४ (१६.२), सांताक्रूझ ३५.७ (२०.८), अलिबाग ३६.५ (२१.७), रत्नागिरी ३५.५ (१९.९), डहाणू ३७.० (२०.५), औरंगाबाद ३१.५ (१४.०), परभणी ३४.४(१५.५), नांदेड ३४ (१५.५), उस्मानाबाद ३१.१ (१६.४), अकोला ३३.६ (१७.४), अमरावती ३१.८ (१८.६), बुलडाणा ३१(१७.४), चंद्रपूर ३२.४ (१९), गोंदिया ३१.२ (१७.९), नागपूर ३१.२ (१६.४), वर्धा ३१.९ (१७.५), यवतमाळ ३२.५ (१५.४).

इतर अॅग्रो विशेष
पाकच्या मुस्क्या आवळणार; विशेष राष्ट्र...नवी दिल्ली: पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ...
चीनमधील शेतीची विस्मयकारक प्रगतीविसाव्या शतकाच्या मध्यावर भारताला स्वातंत्र्य...
सेस, सेवाशुल्क आणि संभ्रमप्रक्रियायुक्त शेतमाल, फळे-भाजीपाला आणि शेवटी...
कृषी पथदर्शक राज्य साकारण्याची संधी :...पुणे : “शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक शेती तंत्र...
डिजिटल परवान्यासाठी लढा देणार : राजू...पुणे : कृषी आयुक्तालयाच्या गुणनियंत्रण विभागाकडून...
`महानंद'मधील गैरव्यवहाराची चौकशी सुरूमुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघ अर्थात...
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील काही...कोल्हापूर : उर्वरित एफआरपीबाबत साखरेची मागणी...
उसाला प्रतिटन २०० ते २२५ अनुदान मिळणार...नवी दिल्ली : साखर कारखान्यांन्या साखरेच्या...
संत्रा, मोसंबी नुकसानीचा अहवाल द्या ः...नागपूर ः संत्रा, मोसंबी पिकांचा बहुवार्षिक पिकात...
शाश्वत विजेचा पर्याय : मुख्यमंत्री सौर...सौर कृषिपंपामध्ये मुख्यतः सोलर पॅनल, वॉटर पंप संच...
स्मार्ट शेती भाजीपाल्याची वर्षभरातील तीन हंगामांत मिरची, त्यातून...
मातीला गंध पुदीन्याचा....सांगली जिल्ह्यात मिरज शहराजवळील मुल्ला मळ्यात...
साखरेच्या विक्री दरात क्विंटलला २००...नवी दिल्ली : साखर विक्रीचा दर २९०० वरून ३१००...
काश्मिरात दहशतवादी हल्ल्यात 'सीआरपीएफ'...श्रीनगर- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात "...
एक रुपयाची लाच घेतल्यास भ्रष्ट...पुणे : कृषी आयुक्तालयाच्या गुण नियंत्रण विभागात...
सांगलीत दुष्काळाच्या तीव्रतेत वाढसांगली : जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची...
खिलते है गुल यहाॅं... येळसेच्या गुलाब...पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ तालुका हा भाताचे आगार...
शेती-पाणी धोरणात हवा अामूलाग्र बदलयंदा महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यातच अभूतपूर्व ‘...
फूल गुलाब का...व्हॅ लेंटाइन डे हा फूल उत्पादक तसेच...
`पॉलिहाउस, शेडनेटधारकांना कर्जमुक्ती...नगर : सरकारची धरसोडीची धोरणे, दुष्काळ,...