नाशिक गारठले; निफाड ४.८ अंशांवर

थंडी
थंडी

पुणे ः उत्तरेकडून येत असलेल्या थंड वाऱ्यामुळे राज्यातील थंडीत वाढ झाली आहे. परिणामी किमान तापमानात मोठी घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीची लाट आली असून, किमान तापमानाचा पारा पाच अंशाच्या खाली आहे. गुरुवारी (ता. २५) सकाळी आठ वाजेपर्यंत नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे ४.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.   मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. कोकण, गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. हिमालयात होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे राज्यातील किमान तापमानात घट झाली आहे. येते दोन दिवस ही थंडी कायम राहील.  मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे ४.८ अंश सेल्सिअस सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली. नाशिकमध्येही ७.२ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. जळगाव, महाबळेश्वर, नाशिक, मालेगाव, सातारा, सोलापूर येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसने घट झाली. कोल्हापूर येथील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने वाढले. सांगली येथील किमान तापमान सरासरीएवढे होते. कोकणात थंडी वाढली   कोकणातील मुंबई, रत्नागिरी, भिरा, डहाणू येथील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत दोन अंशाने घटले. भिरामध्ये १४.० अंश सेल्सिअस अशी सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. अलिबाग येथील किमान तापमान सरासरीएवढे होते. मात्र, दोन ते तीन दिवसांनंतर कोकणातील थंडी कमी होण्याची शक्यता आहे.  मराठवाड्यात किंचित थंडी  कोकण, मध्य महाराष्ट्र या भागात थंडी वाढली आहे. मराठवाड्यातील थंडी कमी होऊन किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सहा अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. परभणी येथील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत सहा अंश सेल्सिअने कमी झाले. औरंगाबाद, नांदेड येथील किमान तापमान तीन अंश सेल्सिअसने घटले. परभणी कृषी विद्यापीठाच्या परिसरात ७.५ अंश सेल्सिअस सर्वात कमी किमान तापमान नोंदविले गेले. गुरुवारी (ता. २५) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस)   मुंबई (सांताक्रूझ) १५.१ (-२), अलिबाग १७.२, रत्नागिरी १६.९ (-२), भिरा १४.० (-१), डहाणू १५.७ (-१), पुणे ९.९ (-१), नगर ७.५ (-५), जळगाव ९.४ (-३), कोल्हापूर १६.० (१), महाबळेश्वर १२.६ (-१), मालेगाव ९.२ (-२), नाशिक ७.२ (-३), निफाड ४.८, सांगली १३.७, सातारा ११.९ (-१), सोलापूर १३.९ (-३), औरंगाबाद ९.२ (-३), बीड १२.२ (-१), परभणी (कृषी विद्यापीठ) ७.५, परभणी शहर ९.० (-६), नांदेड ११.५ (-३), उस्मानाबाद ९.४, अकोला ९.७ (-५), अमरावती १०.२ (-५), बुलडाणा ११.० (-४), चंद्रपूर १०.८ (-५), गोंदिया १०.४ (-३), नागपूर १०.०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com