agriculture news in Marathi, cold signs in north Maharashtra, Maharashtra | Agrowon

उत्तर महाराष्ट्रात थंडीची चाहूल
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 ऑक्टोबर 2018

पुणे : पावसाला पोषक हवामानामुळे राज्याच्या दक्षिण भागातील सोलापूर, सांगली, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. तर उत्तरेकडून थंड वारे महाराष्ट्राकडे येऊ लागल्याने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात रात्रीचे तापमान पुन्हा २० अंशांखाली घसरले अाहे. बुधवारी (ता. २४) नाशिक येथे राज्यातील नीचांकी १४ अंश सेल्सिअस तर नगर येथे १४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. आज (ता. २५) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  

पुणे : पावसाला पोषक हवामानामुळे राज्याच्या दक्षिण भागातील सोलापूर, सांगली, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. तर उत्तरेकडून थंड वारे महाराष्ट्राकडे येऊ लागल्याने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात रात्रीचे तापमान पुन्हा २० अंशांखाली घसरले अाहे. बुधवारी (ता. २४) नाशिक येथे राज्यातील नीचांकी १४ अंश सेल्सिअस तर नगर येथे १४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. आज (ता. २५) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  

बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूरमधील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, सांगलीतील वीटा, इस्लामपूर, तासगाव कवठेमहांकाळ, कडेगाव, कोल्हापुरातील शिरोळ, लातूरमधील औसा, लातूर, उदगीर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर, उस्मानाबाद, कळंब, उमरगा, लोहारा, वाशी तालुक्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. बुधवारी विदर्भ, तेलंगणा परिसरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय होता. आज (ता. २५) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता अाहे. 

राज्यात कमाल तापमानातील वाढ कायम असून, बहुतांशी ठिकाणी तापमानाचा पारा ३४ ते ३७ अंशांच्या आसपास आहे. कोकणातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. बुधवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये सांताक्रूज येथे उच्चांकी ३७.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर दक्षिण मध्य महाराष्ट्र, कोकण वगळता जवळपास सर्वच ठिकाणी रात्रीच्या तापमानात घट होत असल्याचे दिसून आले. नगर, नाशिकसह जळगाव, अौरंगाबाद, उस्मानाबादमध्ये तापमान १६ अंशांच्या खाली उतरले आहे.  

बुधवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, किमान (कंसात) तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३४.८ (१६.५), नगर - (१४.४), जळगाव ३६.०(१६.०), कोल्हापूर ३३.२(२२.७), महाबळेश्‍वर २८.६(१६.९), मालेगाव ३५.८(१७.२), नाशिक ३४.६(१४.०), सांगली ३३.४(२०.७), सातारा ३४.२(१८.८), सोलापूर ३६.०(२१.३), सांताक्रूझ ३७.६(२०.२), अलिबाग ३३.९(२१.५), रत्नागिरी ३३.४(२३.४), डहाणू ३५.८(२२.४), आैरंगाबाद ३५.५(१५.२), परभणी ३६.०(१७.०), नांदेड ३५.०, उस्मानाबाद -(१५.४), अकोला ३६.६(१७.५), अमरावती ३७.२(१८.८), बुलडाणा ३५.० (१८.४), चंद्रपूर ३५.०(२१.०), गोंदिया ३४.०(१७.६), नागपूर ३४.८(१६.५), वर्धा ३५.९(१७.९), यवतमाळ ३७.० (१८.०).

इतर अॅग्रो विशेष
वेतन आयोगाने वाढते गरीब-श्रीमंतांतील दरीमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी ४ ...
दूध दरवाढीसाठीही दाखवा तत्परताआंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीचे (पावडर) दर...
मक्यातील लाग रंग येण्यामागील गूढ उलगडलेमक्यामध्ये काहीवेळा दिसणाऱ्या लाल रंगाच्या...
एफआरपी तुकड्यात घेणार नाही : खासदार...सांगली : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन ८० दिवस...
राज्यात १७८६ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे  : सलग दोन वर्षे पावसाने ओढ दिल्यानंतर...
केळी पट्ट्याला १५० कोटींचा फटकाजळगाव ः डिसेंबर व जानेवारी महिन्यातील थंडीचा...
सुगंधी वनस्पतींची शेती, तेलनिर्मितीही...नगर जिल्ह्यात आंभोळ या दुर्गम भागात मच्छिंद्र...
शेषरावांनी सुनियोजितपणे जपलेली संत्रा...टेंभूरखेडा (ता. वरुड, जि. अमरावती) येथील शेषराव...
निर्यात कोट्यावरून साखर उद्योगात घमासानपुणे : देशात साखरेचा अफाट साठा तयार होत असताना...
शेतकऱ्यांचा जीवनसंघर्ष २०१८ मध्येही...मुंबई : गेल्या चार वर्षांत सिंचन सोडून कृषीच्या...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे : पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या...
हवामान बदलांमुळे दारिद्र्य वाढण्याचा...नवी दिल्ली : हवामानबदलांचा प्रश्न अतिशय गंभीर आहे...
हिमवृष्टीमुळे काश्‍मीर, हिमाचल गारठले;...नवी दिल्ली : हिमवृष्टीमुळे काश्‍मिरसह हिमाचल...
‘रेसिड्यू फ्री’ शेतीतून गुणवत्ताप्राप्त...स्थावर मालमत्ता व्यावसायिक उद्योगातील दोन...
प्रतिष्ठा जपण्यासाठी शेतकऱ्यांच्या...नाशिक : यवतमाळमधील साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन...
शेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यास अखेर...पुणे  ः गेल्या तीन वर्षांपासून बंद...
संत्रा निर्यातीला कृषी विभाग देणार...नागपूर : अपेडाने संत्रा क्‍लस्टरला पहिल्यांदाच...
विदर्भात गुरुवारपासून तुरळक पावसाचा...पुणे   : राज्यातील गारठा कमी झाल्यांनतर...
चढ्या दराचा फायदा कोणाला?मागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....
अतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला? या एका प्रश्नाला अनेक...