agriculture news in marathi, cold wave to be remain for three days says IMD | Agrowon

तीन दिवस हुडहुडी राहणार
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 जानेवारी 2018

निफाड ७ अंशांवर; पुढील आठवड्यात पारा वाढणार
पुणे : उत्तरेकडील काही राज्यांत थंडीची लाट आहे. वारे उत्तरेकडून महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवस राज्यात थंडी राहणार आहे. पुढील आठवड्यापासून थंड वाऱ्याचा प्रवाह कमी होऊन राज्यातील थंडी कमी होण्यास सुरवात होईल. त्यानंतर किमान तापमानाबरोबर, कमाल तापमानाचा पाराही हळूहळू वाढणार असून उन्हाचा चटका वाढेल, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

निफाड ७ अंशांवर; पुढील आठवड्यात पारा वाढणार
पुणे : उत्तरेकडील काही राज्यांत थंडीची लाट आहे. वारे उत्तरेकडून महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवस राज्यात थंडी राहणार आहे. पुढील आठवड्यापासून थंड वाऱ्याचा प्रवाह कमी होऊन राज्यातील थंडी कमी होण्यास सुरवात होईल. त्यानंतर किमान तापमानाबरोबर, कमाल तापमानाचा पाराही हळूहळू वाढणार असून उन्हाचा चटका वाढेल, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

कोकणात किंचित थंडी
उत्तरेकडील वारे कोकणाकडेही वाहत असल्याने येथेही थंडी वाढली आहे. मुंबई, रत्नागिरी, भिरा, डहाणू येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक अंशाने घटले आहे. भिरामध्ये १३.९ अंश सेल्सिअसचे सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. अलिबाग येथील किमान तापमान सरासरीएवढे होते. मात्र, दोन ते तीन दिवसांनंतर कोकणातील थंडी कमी होण्याची शक्यता आहे.

निफाड ७ अंशावर
मध्य महाराष्ट्रात थंडीचा जोर आहे. निफाड (जि. नाशिक) येथे ७ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद बुधवारी (ता.२४) सकाळी आठ वाजेपर्यंत झाली. नाशिकमध्येही ८.८ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. जळगाव, महाबळेश्वर, नाशिक, सातारा येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने घट झाली. कोल्हापूर, मालेगाव, सांगली येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने वाढले. पुणे, नगर येथील किमान तापमान सरासरीएवढे होते.

मराठवाड्यात थंडीत घट
गेल्या आठवड्यापासून मराठवाड्यातील थंडीत चढउतार सुरू आहे. सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र या भागात थंडी वाढली आहे. मराठवाड्यातील थंडी कमी होऊन किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. बीड, परभणी येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअने कमी झाले. औरंगाबाद येथील किमान तापमानात दोन अंश सेल्सिअसने वाढले. परभणी कृषी विद्यापीठाच्या परिसरात ११.५ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमान नोंदविले गेले.

विदर्भात तीव्रता कमी
विदर्भातील अनेक भागांत थंडीची तीव्रता कमी झाली आहे. किमान तापमान पंधरा अंश सेल्सिपर्यंत गेले असून नागपूर, वर्धा येथील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत दोन अंशापर्यंत वाढले आहे. अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ येथील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत १ ते २ अंश सेल्सिअसने घटले आहे. गोंदिया येथे १३.५ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुढील आठवड्यापासून विदर्भातील किमान तापमानात वाढ होणार असून उन्हाची तीव्रता हळूहळू वाढणार आहे.

बुधवारी (ता. २४) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रुझ) १५.४(-१), अलिबाग १७.४, रत्नागिरी १७.६ (-१), भिरा १३.९ (-१), डहाणू १५.५ (-१), पुणे ११.०, नगर १२.५, जळगाव ११.६(-१), कोल्हापूर १५.९ (१), महाबळेश्वर १२.२(-१), मालेगाव १२.४ (१), नाशिक ८.८ (-१), निफाड ७.०, सांगली १५.०(१), सातारा ११.८(-१), सोलापूर १६.३, औरंगाबाद १४.० (२), बीड १२.२ (-१), परभणी (कृषी विद्यापीठ) ११.५, परभणी शहर १३.५ (-१), नांदेड १४.५, अकोला १४.५, अमरावती १४.०(-१), बुलडाणा १५.६(१), चंद्रपूर १४.० (-१), गोंदिया १३.५, नागपूर १५.६ (२), वर्धा १५.८ (२), यवतमाळ १४.०(-२)
 

‘‘उत्तरेकडील काही राज्यांत थंडी अधिक वाऱ्याचा प्रवाह उत्तरेकडून कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रात थंडी
वाढली आहे. मात्र, मराठवाडा, विदर्भात गेल्या आठवड्याच्या तुलनेत काही प्रमाणात थंडी कमी झाली आहे. पुढील आठवड्यात आणखी कमी होईल.
- ए. के. श्रीवास्तव, वैज्ञानिक, हवामान विभाग, पुणे. 

इतर अॅग्रो विशेष
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...
बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...