उत्तर भारतात थंडी कायम

उत्तर भारतात थंडी कायम
उत्तर भारतात थंडी कायम

श्रीनगर : जम्मू-काश्‍मीर, पंजाब, हरियाना व हिमाचल प्रदेशसह उत्तरेतील राज्यांमध्ये थंडीची लाट आहे. काश्‍मीर खोऱ्यात बहुतेक ठिकाणी हिमवर्षाव झाल्याने शनिवारी हवाई वाहतूक विस्कळित झाली होती. उंचीवरील व पठारी भागात काल रात्री हिमवर्षाव झाला, अशी माहिती हवामान विभागाने दिली. काश्‍मीरच्या पठारी भागात तुरळक तप उंचीवरील भागात मध्य हिमवर्षाव झाला. खराब हवामामुळे श्रीनगर विमानतळावरील काही विमाने रद्द करण्यात आली, तर काहींना उशीर होत होता, असे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, काल रात्री श्रीनगरचे तापमान उणे २.०, तर काझिगुंडचे उणे ३.४ अंश सेल्सिअस होते. लडाखमधील लेहमध्ये उणे ९.२ अंश, तर द्रासमध्ये उणे १६. २ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. जम्मू-काश्‍मीरमधील कारगिल हे सर्वांत थंड ठिकाण होते. तेथे पारा उणे १८.९ अंश सेल्सिअसवर होता. पंजाब व हरियानात हुडहुडी पंजाब व हरियानाच्या बहुतेक भागांत आज थंडी होती. धुक्‍यामुळे या दोन्ही राज्यांतील वाहतुकीवर परिणाम झाला होता. चंदीगडमध्ये तापमान ८.६ अंश सेल्सिअस होते. अमृतसरमध्ये ५.८, लुधियानात ८.२ व पतियाळात ९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. हरियानातील अंबाला येथे १० अंश सेल्सिअस तापमान होते. हिसार व कर्नालमध्ये किमान तापमान अनुक्रमे ४.६ व ६ अंश सेल्सिअस होते. हिमवर्षावाची शक्‍यता हिमाचल प्रदेशमधील बहुतेक भागांतील तापमानात शनिवारी वाढ झाली असली, तरी येत्या दोन दिवसांत तेथील डोंगराळ भागांत मोठा हिमवर्षाव होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. किलॉंगमध्ये उणे ५.२ अंश सेल्सिअस असे सर्वाधिक कमी तापमान नोंदविले, अशी माहिती सिमल्याच्या हवामानशास्त्र विभागाचे संचालक मनमोहनसिंग यांनी दिले. किन्नूरमधील कल्पा येथे उणे १.८, सिमल्यात ७.७, डलहौसीत ५.७, तर कुफ्री येथे ३.२ अंश सेल्सिअस तापमान होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com