agriculture news in Marathi, cold wave will be for 5 days, Maharashtra | Agrowon

थंडीचा जोर पाच दिवस राहणार
टीम अॅग्रोवन
रविवार, 28 जानेवारी 2018

पुणे ः हिमालयातील थंड वाऱ्यांचा दाब वाढत आहे. त्यामुळे वातावरणातील पाण्याची वाफ हिमालयातील थंड वारे खाली ढकलत असून, ते कर्नाटकातील बहुतांशी भागापर्यंत खाली गेले आहे. त्यामुळे राज्यातील थंडीचा जोर अजून चार ते पाच दिवस राहणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

पुणे ः हिमालयातील थंड वाऱ्यांचा दाब वाढत आहे. त्यामुळे वातावरणातील पाण्याची वाफ हिमालयातील थंड वारे खाली ढकलत असून, ते कर्नाटकातील बहुतांशी भागापर्यंत खाली गेले आहे. त्यामुळे राज्यातील थंडीचा जोर अजून चार ते पाच दिवस राहणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यातील बहुतांशी भागात सायंकाळपासून थंडी राहत आहे. त्यामुळे ऊन मिळविण्यासाठी थंड पडलेल्या काही शेकोट्या पुन्हा पेटू लागल्या आहे. मात्र रात्री बारानंतर थंडीत वाढ होत असून, पहाटे थंडीचा पारा चांगलाच घसरत आहे. त्यातच हवेत बाष्प असल्याने सकाळी धुके पडत आहे. सकाळी दहानंतर काही प्रमाणात उन्हाचा चटका वाढत असला तरी थंडीच्या उबेमुळे उन्हाचा चटका नागरिकांना हवाहवासा वाटत आहे. शनिवारी (ता. २७) सकाळी नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे  ६.४ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली. 

सध्या राज्यात हवामान कोरडे आहे. तरी थंडीमुळे किमान तापमानाचा पारा दहा अंशांच्या खालीच आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात, तर विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागांत तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.   

येत्या बुधवार (ता. ३१) पर्यत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भात अजून तीन दिवस थंडीच्या लाट राहण्याचा अंदाज आहे. राज्यातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सात अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. मराठवाड्यातील परभणीच्या कृषी विद्यापीठात ७.५ अंश सेल्सिअस, तर विदर्भातील ब्रह्मपुरी, गोंदिया, नागपूर येथे ८.० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. 

शनिवारी (ता. २७) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस)  ः मुंबई (सांताक्रूझ) १५.६ (-२), अलिबाग १८.२ (१), रत्नागिरी १७.३ (-२), भिरा १४.५, डहाणू १४.४ (-३), पुणे १०.३ (-१), नगर ८.६ (-४), जळगाव ८.० (-५), कोल्हापूर १५.८, महाबळेश्वर १३.० (-१), मालेगाव ९.६ (-३), नाशिक ८.८ (-२), निफाड ६.४, सांगली १३.३ (-१), सातारा १०.९ (-३), सोलापूर १४.० (-३), औरंगाबाद ९.८ (-२), परभणी (कृषी विद्यापीठ) ७.५, परभणी शहर ८.५ (-७), नांदेड १०.० (-४), अकोला १०.५(-१),  अमरावती १२.६(-३), बुलडाणा १२.० (-४), चंद्रपूर ११ (-५),  ब्रह्मपुरी, ८.०, गोंदिया ८.० (-६), नागपूर ८.० (-६), वर्धा ११.२ (-३), यवतमाळ ११.४ (-५)

इतर अॅग्रो विशेष
माॅन्सून अंदमानात दाखल !!!पुणे : माॅन्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात...
फेरवाटपातून वाढतोय जलसंघर्षमहाराष्ट्र देशी जलसंघर्षांच्या संख्येत व तीव्रतेत...
शेतकरी सक्षमतेचा ‘करार’भारतीय शेतकऱ्यांसमोर आजची सर्वांत मोठी अडचण कोणती...
शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या...
‘त्या’ कृषी पर्यवेक्षकांना ‘मॅट’चा...अकोला ः अमरावती विभागीय कृषी सहसंचालकाकडून सन...
भुईमुगालाही हमीभाव मिळेनाअकोला ः या हंगामात लागवड झालेल्या भुईमुगाची काढणी...
जैन इरिगेशनला विदर्भातील सूक्ष्म सिंचन...जळगाव : जगातील अग्रगण्य सिंचन कंपनी जैन इरिगेशन...
कडधान्याचा पेरा वाढण्याची शक्यतानवी दिल्ली ः भारतीय हवामान खत्याने यंदा मॉन्सून...
माॅन्सून उद्या अंदमानातपुणे : माॅन्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात...
ढगाळ हवामानामुळे पारा घसरला पुणे : मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात व परिसरात...
‘राष्ट्रीय गोकूळ मिशन’मध्ये पश्चिम...मुंबई :  केंद्र पुरस्कृत‘राष्ट्रीय...
राज्यात कांदा १०० ते ९०० रुपये...नाशिकला ३०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल नाशिक...
धुळे जिल्ह्यात तृणधान्यासह कापूस...धुळे : जिल्ह्यात सुमारे चार लाख ४० हजार हेक्‍टरवर...
पीक लागवडीची अचूक वेळ साधणे महत्त्वाचेअशोक बारहाते यांची ९ एकर शेती. मात्र खरीपात...
तूर, उडीद लागवडीवर सर्वाधिक भरआमच्या भागात खरिपात सहसा पिके घेत नाहीत, रब्बी हा...
बियाणे, लागवड तंत्रात केला बदलसातारा जिल्ह्यातील उडतरे (ता. वाई) येथील सुनील...
‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅग्री...पुणे ः ॲग्रिकल्चर सेक्टरमधील खते, बी - बियाणे,...
उत्पादकांना मिळावा उत्पादनवाढीचा लाभदेशातील काही भागांत विशेषत: कर्नाटक, तमिळनाडू व...
सेसवसुली नव्हे; सर्रास लूटजळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे आवाराबाहेर...
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कुमारस्वामी...बंगळूर : जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी...