agriculture news in marathi, cold weather affect on garpes, sangli, maharashtra | Agrowon

हवामान बदलाचा सांगलीतील द्राक्ष बागांना फटका
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 जानेवारी 2018
बदलत्या हवामानामुळे द्राक्षाचे वजन मिळत नाही. गोडीही कमी आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या हंगामात द्राक्षाचे दर थोडेसे कमी आहेत. दरात सुधारणा होईल, अशी आशा आहे.
- सतीश जाधव, द्राक्ष उत्पादक शेतकरी, सोनी, ता. मिरज.
सांगली  ः गेल्या दोन दिवसांपासून हवामानात बदल झाले आहेत. थंडी वाढली असल्याने द्राक्षांची फुगवण थांबली आहे. द्राक्षाची गोडी कमी आहे, यामुळे याचा फटका द्राक्ष बागांना बसू लागला आहे. यंदाच्या हंगामात द्राक्षाला ५० ते ७० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहेत. 
 
जिल्ह्यात द्राक्षाचे क्षेत्र एक लाख एकर आहे. फळ छाटणीनंतर अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे सुमारे द्राक्ष उत्पादनात ३० टक्के घट होण्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार द्राक्ष उत्पादनही कमी अधिक प्रमाणात मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
 
सध्या मिरज, तासगाव, पलूस, कवठेमहांकाळ या भागातील द्राक्षाचा हंगाम सुरू झाला आहे. द्राक्षाचे दर कमी अधिक प्रमाणात होत आहेत; मात्र दररोज वातावरण बदलत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. थंडी वाढत असल्याने द्राक्षाची अपेक्षित फुगवण होत नाही, त्यातच गोडी वाढत नाही. त्यामुळे मार्केटमध्ये द्राक्षाची कमी अधिक प्रमाणात मागणी होते आहे.
 
गेल्या वर्षी वातावरण चांगले होते. द्राक्षाला दरही चांगले मिळाले. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी समाधानी होते; मात्र यंदा गेल्या वर्षीपेक्षा प्रतिकिलोस १० रुपयांनी दर कमी आहेत. त्यातच पावसाने झालेल्या नुकसानीमुळे उत्पादन घटल्याने आर्थिक ताळमेळ कसा घालायचा, असा प्रश्‍न द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे.

इतर ताज्या घडामोडी
मत्स्यपालनामध्ये योग्य तांत्रिक बदलांची...सध्याच्या मत्स्यपालन पद्धतीमध्ये कोणतेही बदल न...
जळगाव बुरशीयुक्त शेवयांच्या प्रकरणात...जळगाव ः शालेय पोषण आहार वाटपानंतर अंगणवाडीमधील...
सातगाव पठार परिसरात बटाटा लागवडीस सुरवातसातगाव पठार, जि. पुणे : काही गावांमध्ये पावसाने...
सोलापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह...सांगोला/करमाळा : जिल्ह्याच्या काही भागांत...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात...पुणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी...
मातीचा प्रत्येक कण सोन्यासारखा; तो वाया...नाशिक : शेतातील माती म्हणजे कोट्यवधी सूक्ष्म...
नांदेड जिल्ह्यात १ लाख ६५ हेक्टरवर पेरणीनांदेड ः नांदेड जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरीप...
शेतकऱ्यांना पीककर्ज देणे टाळले तर ठेवी...नगर  ः शेतकऱ्यांना सध्या खरीप हंगामासाठी...
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायमसातारा  ः जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, माण,...
नांदेड जिल्ह्यात फक्त ८.२९ टक्के...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील यंदा खरीप पीककर्ज...
तापीच्या पाण्यास गुजरातचा नकारमुंबई  ः पार-तापी नर्मदा नद्याजोड...
कापूस पीक नियोजनातून हमखास उत्पादन वाढसोनगीर, जि. धुळे ः कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी...
औरंगाबाद जिल्ह्यात अखेर पाऊस बरसलाऔरंगाबाद  : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या...
`दमणगंगा नदीजोड योजनेचे फेरसर्व्हेक्षण...नाशिक : दमणगंगा (एकदरे) नदीजोड योजनेचे...
मराठवाड्यात साडेतीन लाख हेक्‍टरवर पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ३ लाख ६७...
पीककर्जासाठी बँक अधिकाऱ्याने केली...दाताळा, जि. बुलडाणा : पीककर्ज मंजूर करून...
माॅन्सून सक्रिय, सर्वत्र चांगल्या...महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी झालेले असून १००४...
‘एसआरआय’पद्धतीने भात लागवडीचे तंत्रएसआरआय पद्धतीने भात लागवड केल्यामुळे रोपे, माती,...
भूमिगत निचरा प्रणालीद्वारे जमिनींची...पाणी व रासायनिक खते यांच्या अनियंत्रित वापरामुळे...
लागवड सावा पिकाची...जून महिन्यात सावा पिकाची पेरणी करावी. दोन ओळीतील...