agriculture news in marathi, collector meeting will take place tomorrow for Recovery | Agrowon

'सांगोला', 'स्वामी समर्थ'च्या वसुलीसाठी उद्या जिल्हाधिकारी घेणार बैठक
टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 जानेवारी 2018

सोलापूर : सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना व स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याकडे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे १६५ कोटी ७२ लाख रुपये थकीत आहेत. या कारखान्यांकडे इतर बॅंकांची कर्जे असल्याने जिल्हा बॅंकेला ही रक्कम वसूल करण्यासाठी अडचणी येत आहेत. या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. ४) बैठक होणार असल्याची माहिती जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी दिली.

सोलापूर : सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना व स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याकडे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे १६५ कोटी ७२ लाख रुपये थकीत आहेत. या कारखान्यांकडे इतर बॅंकांची कर्जे असल्याने जिल्हा बॅंकेला ही रक्कम वसूल करण्यासाठी अडचणी येत आहेत. या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. ४) बैठक होणार असल्याची माहिती जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी दिली.

या दोन्ही कारखान्यांना इतरही बॅंकांनी कर्ज दिले आहे. इतर बॅंकांची कर्जाची रक्कम कमी आहे. त्या तुलनेत जिल्हा बॅंकेच्या कर्जाची व व्याजाची रक्कम १६५ कोटींहून अधिक आहे. त्यामुळे या दोन्ही कारखान्यांच्या मालमत्तेचा ताबा जिल्हा बॅंकेला द्यावा, अशी मागणी बॅंकेच्या वतीने करण्यात आली आहे.

या दोन्ही बॅंकांना दिलेल्या सहभाग कर्जात वसुलीसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक ही अग्रणी बॅंक आहे. राज्य बॅंक वसुलीची प्रक्रिया राबवत नसल्याने जिल्हा बॅंकेला या कारखान्यांकडील कर्ज वसुलीसाठी मालमत्तेवर हक्क सांगण्यास अडचणी येत होत्या. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी जिल्हा बॅंकेच्या वतीने राज्य बॅंकेकडे वारंवार पाठपुरावा केला जात होता.

राज्य बॅंकेच्या प्रशासक मंडळाचे सदस्य अविनाश महागावकर यांनी याबाबत जिल्हा बॅंकेत येऊन अध्यक्ष राजन पाटील व सरव्यवस्थापक किसन मोटे यांच्याशी चर्चा केली होती. सांगोला कारखान्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने ताबा देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. स्वामी समर्थ कारखान्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे यापूर्वीच पत्रव्यवहार करण्यात आला आहे. पण अद्याप निर्णय झालेला नाही. पण आता उद्या (गुरुवारी) जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या बैठकीला राज्य बॅंक व जिल्हा बॅंकेचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित असणार आहेत. त्यात अंतिम निर्णय होण्याची शक्‍यता आहे.

इतर बातम्या
प्रकल्पग्रस्त वयोवृद्ध शेतकऱ्याचा...मुंबई : धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या...
कोरडवाहू शेतजमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची...सोलापूर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत...
हिरव्या मिरचीच्या दरात जळगावात सुधारणाजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शेतकरी कन्या झाली उत्पादन शुल्क निरीक्षकयवतमाळ : इंजिनिअर होऊन प्रशासकीय सेवेत आपले...
‘गिरणा’तून दुसरे आवर्तन सुरू पण... जळगाव  ः जिल्ह्यातील शेतीसाठी महत्त्वपूर्ण...
मातीच्या ऱ्हासासोबत घडले प्राचीन...महान मानल्या जाणाऱ्या अनेक प्राचीन संस्कृतींचा...
अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी सूचना...मुंबई : शासनाच्या ध्येय-धोरणांचे प्रतिनिधीत्व...
विनापरवाना गाळप करणाऱ्या साखर...पुणे : राज्यात विनापरवाना गाळप करणाऱ्या साखर...
माफसूला जागतिक स्तरावर लौकिक मिळवून...नागपूर : पदभरती, ॲक्रीडेशन यासारखी आव्हाने...
कर्जमाफीची रक्कम द्या; अन्याथ लेखी द्यापुणे : २००८ मधील कर्जमाफीची रक्कम नाबार्डने...
नुकसानभरपाईची मागणी तथ्यांवर आधारित...नागपूर : नॅशनल सीड असोसिएशनने बोंड अळीला...
बदल्यांअभावी राज्यात कृषी... नागपूर : राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कृषी...
भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे ७३ टक्के...दावोस  ः गेल्या वर्षभरात देशात निर्माण...
हवामान बदलाचा सांगलीतील द्राक्ष बागांना... सांगली  ः गेल्या दोन दिवसांपासून हवामानात...
साताऱ्यातील चौदाशेवर शेतकरी ठिबक...सातारा : जिल्ह्यातील २०१६-१७ मध्ये चौदाशेवर...
किमान तापमानात घट; नगर ९.४ अंशांवरपुणे ः विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात...
सोलापूर बाजारात कांद्याच्या दरात पुन्हा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रब्बी पेरणीत बुलडाण्याची आघाडी अकोला  ः अमरावती विभागात यंदाच्या रब्बी...
कोल्हापुरात हिरवी मिरची तेजीतकोल्हापूर : येथील बाजारसमितीत या सप्ताहात हिरवी...
नागपुरात तुरीच्या दरात घसरणनागपूर : येथील कळमणा बाजारात आठवड्याच्या...