यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केली कपाशीवर फवारणी

पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना शेतकरी व शेतमजुरांनी आपल्या आरोग्याची आधी काळजी घ्यावी. सुरक्षा किट वापरूनच फवारणी करावी. - डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, यवतमाळ.
जिल्हाधिकाऱ्यांनी केली कपाशीवर फवारणी
जिल्हाधिकाऱ्यांनी केली कपाशीवर फवारणी

यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशी पिकावर कीटनाशकांची फवारणी करताना जिल्ह्यातील २२ शेतकरी व शेतमजुरांचा विषबाधेने मृत्यू झाला होता. यंदा त्याची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुढाकार घेतला असून, गुरुवारी (ता. दोन) तालुक्यातील भिसनी येथील सुरेश पाडसेकर यांच्या शेतात कपाशीवर स्वतः सुरक्षा किट घालून फवारणी केली.

मागील वर्षी खरीप हंगामात कपाशीवर बोंड अळीसह विविध किडींचा प्रादुर्भाव झाला होता. पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी फवारणी केली. परंतु, विषबाधा झाल्याने २२ शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू झाला. सातशेवर शेतकऱ्यांना विषबाधा झाली. यंदा फवारणीदरम्यान विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी सुरक्षा किट घालून फवारणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

याबाबत जनजागृती करण्यासाठी गुरुवार (ता. २) ते शनिवार (ता. ४) ऑगस्टदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या अभियानाची सुरवात करताना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी स्वत: सुरक्षा किट घालून फवारणी केली. कृषी व महसूल विभागाचे अधिकारी या मोहिमेदरम्यान प्रत्यक्ष फील्डवर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी फेरोमोन ट्रॅपचे प्रात्यक्षिक या वेळी दाखवण्यात आले. आरोग्य विभागाच्या माध्यमातून फवारणी करणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांची तपासणी करण्याचे आदेश डॉ. देशमुख यांनी दिले आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com