agriculture news in marathi, Committee for certification of 'NON FAQ' | Agrowon

'नाॅन एफएक्यू' शेतीमालाच्या प्रमाणीकरणासाठी समिती
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017

परभणी : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत सुरू करण्यात आलेल्या शासकीय खरेदी केंद्रावर तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी येणारा शेतीमाल नाॅन एफएक्यू दर्जाचा असल्याचे प्रमाणित करण्यासाठी अनुक्रमे पाच सदस्यीय तसेच त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांनी दिले आहेत.

परभणी : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत सुरू करण्यात आलेल्या शासकीय खरेदी केंद्रावर तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी येणारा शेतीमाल नाॅन एफएक्यू दर्जाचा असल्याचे प्रमाणित करण्यासाठी अनुक्रमे पाच सदस्यीय तसेच त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांनी दिले आहेत.

खुल्या बाजारामध्ये शासकीय आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी केली जात आहे. त्यामुळे आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत मूग, उडीद, सोयाबीन खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, गंगाखेड, पूर्णा या सहा ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत.

परंतु पीक काढणीच्या काळात परतीचा पाऊस झाल्यामुळे या केंद्रावर विक्रीसाठी येणारा शेतमाल ओलसर, डागी असलेला तसेच त्यातील माॅईश्चरचे प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा अधिक, धान्याचा आकार लहान आहे. हा शेतमाल केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या गुणवत्तेमध्ये बसत नसल्यामुळे तो नाकारल्या जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

त्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) गणेश पुरी यांनी जिल्ह्यात आधारभूत किंमत खरेदी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी तालुकास्तरीय समित्या स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या समितीमध्ये सहायक निबंधक (सहकारी संस्था) यांचा प्रतिनिधी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव, सब एजंट संस्थेचे प्रतिनिधी, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, संबंधित बाजार समितीतील ग्रेडर (प्रतवारीकार) या पाच जणांचा समावेश आहे.

ही समिती केंद्रावर आलेला शेतमाल गुणवत्तेचा आहे किंवा नाही याबाबत निर्णय घेईल. केंद्रावर नाकारलेल्या शेतमालाचे केंद्रनिहाय स्वतंत्र नमुने काढून सीलबंद करून त्यावर समिती सदस्यांच्या तसेच शेतकऱ्यांच्या सह्या घ्याव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत.

बाजार समितीमध्ये त्रिस्तरीय समिती
डागी, ओलसर शेतीमालाची लिलावाद्वारे खरेदी करण्यासाठी व्यापारी वर्ग असमर्थता दर्शवित आहेत. एफएक्यू दर्जाचा शेतमाला नसल्याने त्याची खरेदी करता येणे अशक्य असल्याचे व्यापारी सांगत आहेत. नाॅन एफएक्यू दर्जाच्या शेतमालाची आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी करण्यासाठी बाजार समित्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी सेलू येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे करण्यात आली होती.

इतर बातम्या
बारामतीतील विकासाचे काम देशातील...बारामती : ग्रामीण विकासाच्या माध्यमातून सामान्य...
सुकाणू समितीच्या कार्यकारिणीची जवळगाव...अंबाजोगाई, जि. बीड : शेतकरी संघटना व सुकाणू...
मराठवाड्यात पीककर्ज वितरण कासवगतीनेऔरंगाबाद : आढावा बैठकींचा सपाटा, काही ठिकाणी...
‘बोंड अळी व्यवस्थापनाचा महाराष्ट्र...परभणी : कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या...
रताळ्याच्या पिठापासून ‘अ’...टांझानियातील एका खासगी कंपनीने ‘अ’ जीवनसत्त्वांनी...
पोकराअंतर्गत ८४ गावांत आंतरपीक...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत...
पीककर्ज वाटपाचा टक्का वाढेनाअकोला  : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाच्या...
कांदा बाजारात दरवाढीचे संकेतनाशिक : राजस्थान व मध्य प्रदेशमध्ये...
कुलगुरू भट्टाचार्य यांचा राजीनामा अखेर...पुणे : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
नाशिक बाजार समिती संचालकांवर गुन्हे...नाशिक : आचारसंहिता काळात शासकीय वाहनाचा वापर...
उपराष्ट्रपती आज बारामतीतबारामती ः उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू शुक्रवारी (...
‘प्रलंबित वीजजोडणीसाठी मोबाईल नोंदणी...मुंबई : मार्च-२०१८ अखेर राज्यात...
पुणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन...पुणे : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या...
ऊस उत्पादनवाढीसाठी तंत्रज्ञान...पुणे ः सहकारी साखर कारखाने शक्तिस्थळे असून,...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी बहुस्तरीय...पुणे ः शेती क्षेत्राच्या विकासासाठी सिंचन,...
सातारा जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; चार...सातारा : जिल्ह्यात दडी मारलेल्या पावसाने...
कापूस बाजारात भारताला संधीन्यूयाॅर्क ः चालू कापूस हंगामात पिकाला फटका...
मॉन्सून सक्रिय होण्यास प्रारंभ पुणे  ः अरबी समुद्र आणि हिंदी महासागर...
शेतकऱ्यांनी अपघात विमा योजनेचा लाभ...सातारा : राज्यातील सातबारा उताराधारक...
थकली नजर अन्‌ पाय...औरंगाबाद : घोषणा झाली, पण काय व्हतंय कुणास ठाऊक,...