agriculture news in marathi, Committee files report on division of District and talukas in Maharashtra | Agrowon

राज्यात जिल्हा, तालुका विभाजनाच्या हालचाली
टीम अॅग्रोवन
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

मुंबई : राज्यात लोकसंख्येने आणि आकाराने मोठ्या असलेल्या जिल्हा तसेच तालुक्याचे विभाजन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात नेमण्यात आलेल्या दोन स्वतंत्र समित्यांकडून सरकारला अहवाल प्राप्त झाले आहेत. या अहवालांचा अभ्यास करून त्यातील निष्कर्षांच्या आधारे जिल्हा, तालुका विभाजनाबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

मुंबई : राज्यात लोकसंख्येने आणि आकाराने मोठ्या असलेल्या जिल्हा तसेच तालुक्याचे विभाजन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात नेमण्यात आलेल्या दोन स्वतंत्र समित्यांकडून सरकारला अहवाल प्राप्त झाले आहेत. या अहवालांचा अभ्यास करून त्यातील निष्कर्षांच्या आधारे जिल्हा, तालुका विभाजनाबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

राज्य सरकारने तालुका आणि जिल्हा विभाजनाबाबत दोन समित्या नेमल्या होत्या. त्यानुसार अमरावतीचे तत्कालीन विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता यांनी राज्यातील सर्वच जिल्ह्यांचा अभ्यास करून अहवाल सादर केला. तर तालुक्यांच्या संदर्भात अनुपकुमार यांची समिती नेमण्यात आली होती.

या दोन्ही समित्यांचा अहवाल सरकारला सादर झाला असून, आता महसूल विभागाचे प्रधान सचिव आणि मी अभ्यास करून निर्णय घेऊ, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर जिल्हा, तालुका विभाजनाला गती देण्यात येईल. नवे जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीसाठी कोणतीही आर्थिक अडचण येणार नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारने अलीकडेच पाच हजार नवे सज्जे निर्माण केले. त्यामुळे राज्यातील सज्जांची संख्या १३ हजारांवरून १८ हजार इतकी झाली आहे. याशिवाय काही तालुक्यात उपविभाग निर्माण करण्यात आले आहेत. त्यानुसार वाळवा तालुक्यासाठी आष्टा, जतसाठी संख असा उपविभाग झाला आहे. या उपविभागासाठी तहसीलदार देण्यात आल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

अलीकडच्या काळात नव्या जिल्हानिर्मिती थांबली आहे. तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने २०१४ मध्ये ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिती केली. मात्र नागरिकांची मागणी असूनही अनेक जिल्ह्यांचे निर्णय झालेले नाहीत. नाशिकचे विभाजन करून मालेगाव, पुण्याचे विभाजन करून बारामती किंवा इंदापूर, अहमदनगरचे विभाजन करून शिर्डी जिल्हा निर्मिती करावी, अशी मागणी आहे.

इतर अॅग्रो विशेष
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...
बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...