त्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.
ताज्या घडामोडी
मुंबई : राज्यातील सहकारी दूध संघांच्या सध्याच्या दूध दरासंदर्भात येणाऱ्या अडचणींबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर यांच्या निर्देशानुसार विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय सोमवारी काढण्यात आला आहे.

राज्यातील प्रमुख सहकारी दूध उत्पादक संघांच्या अडीअडचणींच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी श्री. जानकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस राज्यातील विविध सहकारी दूध संघांचे प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या अध्यक्षा आदी उपस्थित होते. या बैठकीत ठरल्याप्रमाणे सचिव (पदुम) यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे.
सचिव (पदुम) यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये दुग्धव्यवसाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपसचिव (दुग्ध) यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. समितीने आपला अहवाल १० दिवसांत सादर करावा, असेही शासन निर्णयात नमूद केले आहे.
- 1 of 347
- ››