agriculture news in Marathi, Committee submitted report on milk business problems, Maharashtra | Agrowon

दुग्ध व्यवसाय समस्यांप्रश्नी समितीचा अहवाल सादर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 डिसेंबर 2017

पुणे: राज्यातील सहकारी दूध संघ आणि कोसळलेल्या दूध दरामुळे निर्माण झालेल्या समस्यांबाबत नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीस समितीचा अहवाल राज्य शासनाला सादर केला आहे. राज्याचे दुग्धविकास सचिव विकास देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समितीने हा अहवाल तयार केला आहे. दुग्धविकास आयुक्त राजीव जाधव आणि महानंदचे कार्यकारी संचालक दिलीप शिंदे यांनीदेखील समिती सदस्य म्हणून आपले महत्त्वपूर्ण अभिप्राय अहवालात दिले आहेत.

पुणे: राज्यातील सहकारी दूध संघ आणि कोसळलेल्या दूध दरामुळे निर्माण झालेल्या समस्यांबाबत नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीस समितीचा अहवाल राज्य शासनाला सादर केला आहे. राज्याचे दुग्धविकास सचिव विकास देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समितीने हा अहवाल तयार केला आहे. दुग्धविकास आयुक्त राजीव जाधव आणि महानंदचे कार्यकारी संचालक दिलीप शिंदे यांनीदेखील समिती सदस्य म्हणून आपले महत्त्वपूर्ण अभिप्राय अहवालात दिले आहेत.

‘‘दुधाचे दर दूध संघांनी कमी केल्यामुळे शेतकऱ्यांवर ओढावलेल्या स्थितीचा अभ्यास करण्यात आला आहे. दर कमी होण्यास मुख्यत्वे दूध पावडरचे कोसळलेले दर कारणीभूत आहेत. या समस्येवर मात करण्यासाठी समितीने काही धोरणात्मक बदल सुचविले आहेत. तथापि, अहवालातील शिफारशी आम्ही सध्या सांगू शकत नाही,’’ अशी माहिती समितीच्या सूत्रांनी दिली.

दरम्यान, समितीच्या अहवालातील निष्कर्ष पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्याकडून पुन्हा तपासले जाण्याची शक्यता आहे. ‘‘त्रिसदस्यीय समितीच्या शिफारशी लागू करताना राज्याच्या तिजोरीवर काही आर्थिक भार पडतो का, तसेच धोरणात्मक बदल केल्यास त्याचे राजकीय परिणाम कसे असतील, याचाही अंदाज घेतला जाण्याची शक्यता आहे,’’ असे सूत्रांचे म्हणणे आहे.  

शेतकऱ्यांना मिळत असलेला कमी दूध दर आणि अडचणीत आलेल्या दूध संघांच्या स्थितीवर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तोडगा निघण्याची शक्यता आहे. तोडगा काढण्यासाठी त्रिसदस्यीय समितीचा अभ्यास सरकाराला मार्गदर्शक ठरणार आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी २७ रुपये, तर म्हशीच्या दुधासाठी प्रतिलिटर ३६ रुपये दर द्यावा, असे आदेश दुग्धविकास खात्याने यापूर्वीच काढले आहेत. मात्र, एकाही संघाला नव्या दराप्रमाणे दुधाची खरेदी करता आलेली नाही. परिणामी या संघांना बरखास्तीच्या नोटिसा सरकारने बजावण्यात आल्या आहेत. 

अहवाल जाहीर करून तातडीने मदत करा
सुधारित दर देत नसल्याच्या कारणावरून राज्य शासनाने दूध संघांना सहकार कायद्याच्या कलम ७९अ प्रमाणे जवळपास १५ नोटिसा दिल्या आहेत. काही संघांनी न्यायालयात धाव घेऊन कारवाईला स्थगिती आणली आहे. या प्रकरणात शासनाचीच कोंडी झाल्यामुळे दूध संघांवरील कारवाई तूर्त स्थगित करावी लागली आहे. मात्र, आता त्रिसदस्यीय समितीचा अहवाल जाहीर करून संघांना तातडीने मदत करणे अपेक्षित आहे, असे सहकारी संघांच्या सूत्रांनी सांगितले आहे.

इतर अॅग्रो विशेष
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर...नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी...
बीटी बियाणे १५ मेपूर्वी विक्रीस मनाईपुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५...
जमिनीचे जैविक पृथक्करणआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून...
सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यातसांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील...
काळजी घ्या : उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ,...
शून्यातून राऊत दांपत्याने उभारली...लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत...
संत्रा बागेत काटेकोर पाणी व्यवस्थापन संत्रा पिकात पाणी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवावे...
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...