agriculture news in Marathi, committee will study on bullock cart race, Maharashtra | Agrowon

बैलगाडा शर्यतीसाठी अभ्यास समिती
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

मुंबई ः बैल हा घोड्याप्रमाणेच धावणारा प्राणी असल्याचे सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी राज्य सरकारने घेतली आहे. विशेष म्हणजे त्यासाठी अभ्यास गटाची स्थापना केली आहे.

मुंबई ः बैल हा घोड्याप्रमाणेच धावणारा प्राणी असल्याचे सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी राज्य सरकारने घेतली आहे. विशेष म्हणजे त्यासाठी अभ्यास गटाची स्थापना केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने २०१४ मध्ये ए. नागराजा विरुद्ध भारतीय जीवजंतू कल्याण मंडळ या प्रकरणामध्ये अंतिम निकाल देताना "बैल हा घोड्यासारखा कार्यकौशल्य प्रदर्शित करणारा प्राणी नाही, त्याची शरीररचना विचारात घेता तो शर्यतीमध्ये धावण्यास सक्षम नाही,'' असे निरीक्षण नोंदविले होते. त्याच आधारे उच्च न्यायालयानेही गेल्या महिन्यात बैलगाडी शर्यतींना परवानगी नाकारली होती. शर्यतींना परवानगी मिळावी यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले असून, अद्याप सुनावणीला सुरवात झालेली नाही. 

बैलगाडी शर्यतींना परवानगी मिळावी यासाठी राज्यातील ग्रामीण भागातून विशेषतः पश्‍चिम महाराष्ट्रातील १६ तालुक्‍यांमधून सरकारवर मोठ्या प्रमाणात दबाव आहे. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयात जुन्या निकालाच्या आधारेच राज्य सरकारची याचिका नाकारली जाऊ नये यासाठी बैल हा धावणारा प्राणी असल्याचा अहवाल तयार करण्यासाठी सरकारची धडपड सुरू असल्याचे समजते.

राज्य सरकारने बैल हा धावणाराच प्राणी आहे हे सिद्ध करून अहवाल सादर करण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना केली आहे. हा अहवाल एका महिन्यात राज्य सरकारला सादर करावा, असे निर्देश पशू, दुग्ध व मत्स्यविभागाने दिले आहेत. तसेच, या अभ्यासासाठी समितीने परदेशी तज्ज्ञांचीही मदत घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.

इतर अॅग्रो विशेष
कोरडवाहू शेतजमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची...सोलापूर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत...
बीजी - ३ चे घोडे अडले कुठे?आगामी हंगाम धोक्‍याचा सन २०१७ च्या खरीप हंगामात...
आव्हान पाणी मुरविण्याचेठिबक सिंचन अनुदानासाठी यावर्षी विक्रमी निधी...
भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे ७३ टक्के...दावोस  ः गेल्या वर्षभरात देशात निर्माण...
किमान तापमानात घट; नगर ९.४ अंशांवरपुणे ः विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात...
नागपुरात तुरीच्या दरात घसरणनागपूर : येथील कळमणा बाजारात आठवड्याच्या...
देशात खालावत आहे जमिनीचे आरोग्यनागपूर : खोल मशागत, नियंत्रित खत व्यवस्थापनाला...
बोंड अळी भरपाईसाठी सुनावणी आजपासूनपुणे : राज्यात शेंदरी बोंड अळीमुळे...
तूर खरेदी अडकली नोंदणीतचलातूर ः तेलंगणा, कर्नाटक राज्याने हमीभावाप्रमाणे...
कष्ट, अभ्यासातून जोपासलेली देवरेंची...नाशिक जिल्ह्यातील नाशिक सटाणा तालुक्याचा परिसर...
लसीकरणाअभावी दाेन काेटी पशुधनाचे...पुणे ः सुमारे ३० काेटींची निविदा मिळविण्यासाठी...
सिद्धेश्‍वर यात्रेतील बाजारात खिलार बैल...सोलापूरचे ग्रामदैवत श्री. सिद्धेश्‍वर...
जिरायती शेती विकासातून थांबेल स्थलांतरमराठवाडा आणि विदर्भ विभागातील जिरायती शेतकरी...
संभ्रम दूर करामागील खरीप हंगामात चांगल्या पाऊसमानाच्या...
मुद्रा योजनेच्या १० लाखांपर्यंतच्या...कोल्हापूर : तरुणांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर...
रब्बीचा ६१.८ दशलक्ष हेक्टरवर पेरानवी दिल्ली ः भारतातील रब्बी क्षेत्रात यंदा गेल्या...
प्रशिक्षणांना दांड्या मारणाऱ्या...अकोला : अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता...
ठिबक अनुदानासाठी ७६४ कोटींचा निधीपुणे: राज्यात ठिबक संच बसविलेल्या शेतकऱ्यांना...
मराठवाड्यात ४३ टक्‍के जमीन चुनखडऔरंगाबाद : मराठवाड्यातील जमिनीचा पोत दिवसेंदिवस...
दशकातील सर्वांत मोठ्या कापूस आयातीचे...जळगाव ः महाराष्ट्रासह काही प्रमुख कापूस उत्पादक...