agriculture news in marathi, commodity rates in market committee, aurangabad, maharashtra | Agrowon

औरंगाबाद येथे भुईमूग शेंगा २२०० ते २६०० रुपये क्विंटल
टीम अॅग्रोवन
रविवार, 3 जून 2018

औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. २) भुईमूग शेंगांची ७७ क्‍विंटल आवक झाली. या शेंगांना २२०० ते २६०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. २) भुईमूग शेंगांची ७७ क्‍विंटल आवक झाली. या शेंगांना २२०० ते २६०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची ५५ क्‍विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला २५०० ते ३००० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. कांद्याची १७५ क्‍विंटल आवक होती. कांद्याला २०० ते ९०० रुपये क्‍विंटल दर मिळाले. टोमॅटोची १४६ क्‍विंटल आवक झाली. टोमॅटोला ५०० ते १५०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. वांग्याची ३१ क्‍विंटल आवक होती, त्यास ७०० ते १५०० रुपये क्‍विंटल दर राहिला. १२ क्‍विंटल आवक झालेल्या गवारीला २००० ते ३००० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. भेंडीची आवक २० क्‍विंटल होती. भेंडीला २००० ते २८०० रुपये क्‍विंटल दर मिळाला. काकडीची आवक ५५ क्‍विंटल झाली. काकडीला ६०० ते १४०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. लिंबाची ११ क्‍विंटल आवक झाली. लिंबाचे दर १००० ते २५०० रुपये क्‍विंटल राहिले.

बाजारसमितीत दुधी भोपळ्याची २२ क्‍विंटल आवक झाली.  दुधी भोपळ्याला ५०० ते ९०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. कोबीची ८८ क्‍विंटल आवक झाली. कोबीला ४०० ते ५०० रुपये क्‍विंटल दर मिळाले. फ्लॉवरची १५ क्‍विंटल आवक झाली. फ्लॉवरला १५०० ते २५०० रुपये क्‍विटंल असा दर मिळाला. शेवग्याची आवक २१ क्‍विंटल झाली. शेवग्याला २५०० ते ३५०० रुपये क्‍विंटल दर मिळाला.

बाजारसमितीत कैरीची २७ क्‍विंटल आवक झाली. कैरीला ७०० ते १५०० रुपये क्‍विंटल दर मिळाले. मेथीची ७ हजार जुड्या आवक झाली. मेथीचे दर ८०० ते १००० रुपये प्रतिशेकडा होते. पालकाची ९ हजार जुड्या आवक झाली. पालकास ३०० ते ५०० रुपये प्रतिशेकडा असा दर मिळाला. कोथिंबिरीची आवक १९ हजार जुड्या झाली. कोथिंबिरीला ५०० ते ८०० रुपये प्रतिशेकडा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

इतर ताज्या घडामोडी
संत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल...नागपूर  ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित...
सूक्ष्म सिंचन विस्तारातील अडचणी, पर्याय...औरंगाबाद   : औरंगाबाद येथे आयोजित...
‘ई- टेंडरिंग’ रेशीम उत्पादकांच्या मुळावरपुणे  ः राज्यात पाणीटंचाईमुळे सर्वत्र...
आंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ७४...पुणे  : साखर आयुक्तालयासमोर गेल्या तीन...
रोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात... नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ...
लोणार तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे...बुलडाणा : जिल्ह्यात द्राक्ष शेती टिकवून ठेवण्यात...
कृषी सल्ला (कोकण विभाग)भात रोप अवस्था : उन्हाळी भात रोपवाटिकेस...
थंडीच्या काळात केळी बागांची काळजीकेळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४...
पहाटे, रात्री थंडीचे प्रमाण अधिक राहीलमहाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगावर १०१४...
पाणंद रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू अकोला : शासनाच्या पाणंद रस्ते योजनेतून...
`साखर उद्योगातील संघटित गुन्हेगारी...मुंबई : गेल्या वर्षीच्या हंगामातील ७०-३०...
शासकीय दूध डेअरीत अमोनियाची गळतीअकोला : येथील मूर्तिजापूर मार्गावर असलेल्या...
कृषी योजनेतील विहिरींनाही दुष्काळाचा...धुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशात विहिरींनी...
नागपुरात `जलयुक्‍त`चा निधी आटलानागपूर : फडणवीस सरकारची महत्त्वाकांशी योजना...
मराठवाड्याची ७६२ कोटींची अतिरिक्‍त...औरंगाबाद ः शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेच्या...
नत्राच्या कार्यक्षम वापरासाठी सेन्सरचा...कृषी क्षेत्रातून होणाऱ्या नत्रांच्या प्रदूषणाची...
कृषिक प्रदर्शनातील प्रात्यक्षिके पाहून...बारामती, जि. पुणे ः कृषिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या...
जाती-धर्माच्या भिंती तोडणे हीच स्व....इस्लामपूर, जि. सांगली : लोकनेते राजारामबापू पाटील...
पशुधन संख्येनुसार चारा उपलब्ध करून द्यापरभणी ः परभणी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पशुधन...
ज्वारी, हरभरा, करडईच्या पेरणी...परभणी ः जिल्ह्यात यंदा ज्वारी, हरभरा, करडई या तीन...