औरंगाबाद येथे कारले १५०० ते २५०० रुपये क्‍विंटल

कारली
कारली

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ९) कारल्याची ४९ क्‍विंटल आवक झाली. कारल्याला १५०० ते २५०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची २२७ क्‍विंटल आवक झाली. मिरचीला १६०० ते ३००० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. कांद्याची ५३९ क्‍विंटल आवक झाली. कांद्याचे दर ३०० ते ८०० रुपये क्‍विंटल होते. वांग्याची आवक ५५ क्‍विंटल झाली. वांग्याला ५०० ते १६०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. गवारीची ३२ क्‍विंटल आवक झाली. गवारीला २५०० ते ३५०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. भेंडीची ३४ क्‍विंटल आवक झाली. भेंडीला २२०० ते ३००० रुपये क्‍विंटल दर मिळाले. काकडीची ५१ क्‍विंटल आवक झाली. काकडीला ७०० ते १२०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला.

बाजारसमितीत लिंबूची १८ क्‍विंटल आवक झाली. लिंबास १५०० ते २००० रुपये क्‍विंटल दर मिळाले. दुधी भोपळ्याची आवक १२ क्‍विंटल झाली. दुधी भोपळ्यास ५०० ते १००० रुपये क्‍विंटल दर मिळाला. कोबीला ७७ क्‍विंटल आवक झाली. कोबीला  ३०० ते ५०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला.  फ्लॉवरची ३० क्‍विंटल आवक झाली. फ्लॉवरला १५०० ते २५०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. ढोबळ्या मिरचीची आवक ३९ क्‍विंटल झाली. ढोबळ्या मिरचीला २००० ते ३००० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला.

शेवग्याची १८ क्‍विंटल आवक झाली. शेवग्याला १५०० ते २५०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. कैरीची १६५ क्‍विंटल आवक झाली. कैरीला ७०० ते १५०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. भुईमुगाची १५ क्‍विंटल आवक झाली. भुईमूग शेंगांना २५०० ते ३००० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. मेथीची ९५०० जुड्या आवक झाली. मेथीला प्रतिशेकडा ६०० ते ९०० रुपये दर मिळाला. पालकाची १४ हजार जुड्या आवक झाली. पालकचे दर ३०० ते ५०० रुपये प्रतिशेकडा राहिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com