औरंगाबाद येथे हिरवी मिरची २००० ते २५०० रुपये क्‍विंटल

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.१८) हिरव्या मिरचीची १५७  क्‍विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला २००० ते २५०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सुत्रांनी दिली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये टोमॅटोची १८१ क्‍विंटल आवक झाली. टोमॅटोला ३०० ते ८०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. कांद्याची ३३० क्‍विंटल आवक होती. कांद्याला ४०० ते १००० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. वांग्याची २० क्‍विंटल आवक झाली. वांग्याला २००० ते २७०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. गवारीची १६ क्‍विंटल आवक झाली. गवारीला १००० ते १४०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. भेंडीची ६२ क्‍विंटल आवक झाली. भेंडीला ५०० ते ७०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. वालशेंगांची ४ क्‍विंटल आवक झाली. वालशेंगांना ८०० ते १००० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. चवळीची ९ क्‍विंटल आवक झाली. चवळीला ७०० ते ९०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. मकाची १९५ क्‍विंटल आवक झाली. मक्‍याला ३०० ते ५०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. काकडीची ७० क्‍विंटल आवक झाली. काकडीला २०० ते ४०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला.

लिंबाची ९ क्‍विंटल आवक झाली. लिंबाचे दर ८०० ते १००० रुपये क्‍विंटल होते. कारल्याची आवक ५९ क्‍विंटल होती. कारल्याला ७०० ते १००० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. दुधीभोपळ्याची १० क्‍विंटल  आवक झाली. दुधी भोपळ्याला ४०० ते ५०० रुपये क्‍विंटल दर मिळाले. कोबीची ११७ क्‍विंटल आवक झाली. कोबीला ५०० ते ७०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. फ्लॉवरची आवक ६५ क्‍विंटल होती. त्यास ६०० ते ८०० रुपये क्‍विंटल दर मिळाले. ढोबळी मिरचीची १७ क्‍विंटल आवक झाली. ढोबळी मिरचीला १८०० ते २००० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. शेवग्याची १२ क्‍विंटल आवक झाली. शेवग्याला १००० ते ३००० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला. डांगरची ३० क्‍विंटल आवक झाली. डांगरला ५०० ते ७०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाला.

पालेभाज्यांमध्ये मेथीची १४ हजार जुड्या आवक झाली. मेथीला ३०० ते ५०० रुपये शेकडा दर मिळाला. पालकाची १२ हजार जुड्या आवक झाली. पालकास १५० ते २५० रुपये प्रतिशेकडा दर मिळाला. कोथिंबिरीची ३० हजार जुड्या आवक झाली. कोथिंबिरीला १०० ते ३०० रुपये शेकडाचा दर मिळाला. भुईमूग शेंगांची ३० क्‍विंटल आवक झाली. भुईमूग शेंगांना २८०० ते ३२०० रूपये क्‍विंटल दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com