जळगावमध्ये कैरी ७००० रुपये क्विंटल

कैरी
कैरी
जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कैऱ्यांची आवक सुरू झाली असून, मंगळवारी (ता. १३) कैरीला ७००० रुपये क्विंटल दर मिळाला. 
 
कैरीची सात क्विंटल आवक झाली. सध्या आवकेला सुरवात झाली असून, सुरवातीच्या दरांचा लाभ कैरी उत्पादकांना मिळत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, फुलंब्री, घाट भागांतून कैरीची आवक  होत आहे. स्थानिक भागातून आवक नाही. गावरान प्रकारची स्थानिक कैरी येण्यास अजून महिनाभराचा कालावधी आहे, अशी माहिती मिळाली. 
 
बाजारात मंगळवारी हिरव्या मिरचीची २१ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला १५०० ते २००० रुपये तर सरासरी १७०० रुपये क्विंटल दर होता. कारल्याची दोन क्विंटल आवक झाली. कारल्यास ३००० रुपये क्विंटल दर मिळाला. लाल कांद्याची ४५५ क्विंटल आवक झाली. कांद्यास ३५० ते १०२५ रुपये तर सरासरी ७५० रुपये क्विंटल दर होता. कोथींबिरीची पाच क्विंटल आवक झाली. कोथिंबीरीला ८०० ते १५०० रुपये तर सरासरी १००० रुपये क्विंटल दर मिळाला.
 
पालकची दोन क्विंटल आवक झाली, पालकाला १००० रुपये क्विंटल दर होता. टोमॅटोची ३० क्विंटल आवक झाली. टोमॅटोला ३०० ते ५०० रुपये, तर सरासरी ४०० रुपये क्विंटल दर मिळाला. वाल शेंगांची १३ क्विंटल आवक झाली. वालशेंगांना १००० ते १५०० रुपये तर सरासरी ११०० रुपये क्विंटल दर मिळाला. वांग्यांची ३० क्विंटल आवक झाली.
 
वांग्याला ३०० ते ६०० रुपये तर सरासरी ४०० रुपये क्विंटल दर होता. गवारची दोन क्विंटल आवक झाली. तिला ४००० रुपये क्विंटल दर मिळाला. भेंडीची १९ क्विंटल आवक झाली. भेंडीला १३०० ते २१०० रुपये, तर सरासरी १६०० रुपये क्विंटल दर होता. बटाट्याची २५० क्विंटल आवक झाली. बटाट्याला ३५० ते १२०० रुपये, तर सरासरी ७५० रुपये क्विंटल दर मिळाला.
 
डाळिंबाची नऊ क्विंटल आवक झाली. त्याला २००० ते ३००० तर सरासरी २५०० रुपये क्विंटल दर मिळाला. लिंबूची सात क्विंटल आवक झाली. त्याला १००० ते ४००० रुपये, तर सरासरी २५०० रुपये क्विंटल दर मिळाला. चवळी शेंगांची तीन क्विंटल आवक झाली. तिला २१०० रुपये क्विंटल दर होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com