agriculture news in marathi, commodity rates in market committee, jalgaon,maharashtra | Agrowon

जळगाव येथे आंबा ४५०० ते ८००० रुपये क्विंटल
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 19 एप्रिल 2018
जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १८) केशर, पायरी आंब्याला ४५०० ते ८००० रुपये तर सरासरी ६००० रुपये क्विंटल असा दर मिळाला. आंब्याची आवक १७ क्विंटल झाली. ही आवक आंध्र प्रदेश, गुजरात व ठाणे, कल्याण येथील मोठ्या व्यापाऱ्यांकडून होत आहे. आवक कमी आहे. त्यातच अक्षय तृतीयेला मागणी अधिक राहिल्याने दर बऱ्यापैकी राहिले.
 
काही व्यापाऱ्यांनी आंब्यांची आगाऊ नोंदणी आंध्र प्रदेशसह गुजरातमधील पुरवठादारांकडे करून घेतली होती. स्थानिक भागातून कुठलीही आवक नसल्याची माहिती बाजार समितीमधील सूत्रांनी दिली. 
 
जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १८) केशर, पायरी आंब्याला ४५०० ते ८००० रुपये तर सरासरी ६००० रुपये क्विंटल असा दर मिळाला. आंब्याची आवक १७ क्विंटल झाली. ही आवक आंध्र प्रदेश, गुजरात व ठाणे, कल्याण येथील मोठ्या व्यापाऱ्यांकडून होत आहे. आवक कमी आहे. त्यातच अक्षय तृतीयेला मागणी अधिक राहिल्याने दर बऱ्यापैकी राहिले.
 
काही व्यापाऱ्यांनी आंब्यांची आगाऊ नोंदणी आंध्र प्रदेशसह गुजरातमधील पुरवठादारांकडे करून घेतली होती. स्थानिक भागातून कुठलीही आवक नसल्याची माहिती बाजार समितीमधील सूत्रांनी दिली. 
 
बाजारात खरबुजाची २५ क्विंटल आवक झाली. त्यास ८०० ते १४०० रुपये तर सरासरी १००० रुपये क्विंटल असा दर होता. लिंबांची पाच क्विंटल आवक झाली. लिंबास २००० ते ४५०० रुपये तर सरासरी ३००० रुपये क्विंटल असा दर मिळाला. कलिंगडाची २० क्विंटल आवक झाली. कलिंगडाला ४०० ते ८०० रुपये तर सरासरी ६०० रुपये क्विंटल दर होता. भेंडीची १० क्विंटल आवक झाली. भेंडीला १००० ते २००० रुपये तर सरासरी १५०० रुपये क्विंटल दर मिळाला.
 
कैरीची १२ क्विंटल आवक झाली. कैरीला १००० ते २००० रुपये तर सरासरी १५०० रुपये क्विंटल दर मिळाला. आलेची (अद्रक) १८ क्विंटल आवक झाली. त्यास १२०० ते २५०० रुपये तर सरासरी १५०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. बटाट्याची १०० क्विंटल आवक झाली. बटाट्याला ९०० ते १६०० रुपये सरासरी १२०० रुपये क्विंटल दर मिळाला. गवारीची दोन क्विंटल आवक झाली. त्याला ३८०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. कोबीची ११ क्विंटल आवक झाली. कोबीला ५०० ते १००० रुपये तर सरासरी ५०० रुपये क्विंटल असा दर होता.
 
कारल्याची चार क्विंटल आवक झाली. कारल्याला १५०० ते ३५०० रुपये तर सरासरी २००० रुपये क्विंटल असा दर मिळाला. कोथिंबिरीची सात क्विंटल आवक झाली. कोथिंबिरीला १५०० ते ३००० रुपये तर सरासरी २२०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. मेथीची सहा क्विंटल आवक झाली. मेथीला २००० ते २५०० रुपये तर सरासरी २५०० रुपये क्विंटल असा दर होता. लाल कांद्याची ५०० क्विंटल आवक झाली. लाल कांद्याला ३५० ते ६०० रुपये तर सरासरी ४५० रुपये क्विंटल असा दर मिळाला.

इतर ताज्या घडामोडी
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...