जळगावमध्ये जांभूळ ३००० ते ७००० रुपये क्विंटल

जांभूळ
जांभूळ
जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२) जांभळाची तीन क्विंटल आवक झाली. त्यास ३००० ते ७००० रुपये तर सरासरी ५ हजार रुपये क्विंटल असा दर मिळाला. स्थानिक भागातून जांभूळाची आवक सुरू झाली आहे. चोपडा, पाचोरा, एरंडोल भागात बांधावरची शेती म्हणून जांभूळाची लागवड अनेक शेतकऱ्यांनी केली आहे. येत्या १० ते १२ दिवसांत जांभूळाची आवक अधिक होईल, असे संकेत आहेत. 
 
बाजारात बुधवारी आंब्याची ४२ क्विंटल आवक झाली. त्यास २००० ते ४०६५ रुपये तर सरासरी ३१०० रुपये क्विंटल असा दर होता. लिंबाची नऊ क्विंटल आवक झाली. लिंबास २२०० ते ४५०० रुपये तर सरासरी ३००० रुपये क्विंटल असा दर मिळाला. खरबुजाची ११ क्विंटल आवक झाली. खरबुजाला ६०० ते १००० रुपये तर सरासरी ७०० रुपये क्विंटल दर होता. कलिंगडाची पाच क्विंटल आवक झाली. त्याला ५०० ते ७०० रुपये तर सरासरी ६०० रुपये क्विंटल दर मिळाला.
 
आल्याची (अद्रक) १५ क्विंटल आवक झाली. आल्यास १६०० ते ४०८० रुपये तर सरासरी ३००० रुपये क्विंटल असा दर मिळाला. बटाट्याची ३५० क्विंटल आवक झाली. बटाट्‌याला ८०० ते १६०० रुपये तर सरासरी ११०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. भेंडीची सहा क्विंटल आवक झाली. भेंडीला १००० ते १८०० रुपये तर सरासरी १२०० रुपये क्विंटल असा दर होता. कोबीची सात क्विंटल आवक झाली. कोबीला ७०० ते १४०० रुपये तर सरासरी १००० रुपये क्विंटल असा दर मिळाला. गवारची दोन क्विंटल आवक झाली. गवारीला ३००० रुपये क्विंटल असा दर होता. 
 
कोथिंबिरीची सात क्विंटल आवक झाली. कोथिंबिरीला १२०० ते २५०० रुपये तर सरासरी १७०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. मेथीची पाच क्विंटल आवक झाली. मेथीला १००० ते २२०० रुपये तर सरासरी १५०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. पालकची दोन क्विंटल आवक झाली. पालकाला १५०० रुपये क्विंटल असा दर होता. टोमॅटोची २५ क्विंटल आवक झाली. टोमॅटोला ४०० ते १००० रुपये तर सरासरी ६०० रुपये क्विंटल असा दर मिळाला.
 
वाल शेंगांची आठ क्विंटल आवक झाली. त्यांना   १००० ते २००० रुपये तर सरासरी १५०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. वांग्यांची २० क्विंटल आवक झाली. वांग्याला ४०० ते ७०० रुपये तर सरासरी ५०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. हिरव्या मिरचीची २५ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला १००० ते १९०० रुपये तर सरासरी १४०० रुपये क्विंटल दर होता, अशी माहिती बाजारसमितीच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com