मुंबईत लसूण २००० ते ४००० रुपये क्विंटल

लसूण दर
लसूण दर

मुंबई : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवक आणि मागणी स्थिर आहे. बाजार समितीत मंगळवारी (ता. १९) भाजीपाल्याची ५५० ट्रक आवक झाली. बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. १८) लसणाची ३५२० क्विंटल आवक झाली. लसणाला २००० ते ४००० रुपये तर सरासरी ३००० रुपये क्विंटल दर होता, अशी माहिती बाजार समिती सूत्रांनी दिली.

बाजार समितीत स्थानिक भागातील शेतमालाची आवक कमी असून, काही प्रमाणात परराज्यांतून आवक सुरू आहे. नाशिकमधील लिलाव तीन दिवस बंद असल्याने कांद्याची आवक वाढली होती. नाशिकमधील लिलाव पुन्हा सुरू होऊनदेखील सोमवारी कांद्याची १७,९२० क्विंटल आवक झाली. कांद्याला १२०० ते १६०० रुपये तर सरासरी १४०० रुपये क्विंटल असे दर होते. बटाट्याची १४,६०० क्विंटल आवक झाली. बटाट्याला ५०० ते ११०० रुपये, तर सरासरी ८५० रुपये क्विंटल दर होते.

वांगी, टॉमेटो, गाजर, कोबी, फ्लॉवर आदी भाज्यांचे मागील आठवड्याच्या तुलनेत दर वाढले आहेत. सोमवारी वाटाण्याची २७० क्विंटल आवक झाल्याचे येथील व्यापारी नानासाहेब बोरकर यांनी सांगितले.

स्थानिक आवक वाढल्याने वाटाण्याचे दर स्थिर आहेत. वाटाण्याला सरासरी ६००० रुपये क्विंटल दर होता. टोमॅटोला सरासरी १५०० रुपये क्विंटलपर्यंत दर होते. ज्वाला मिरचीची १५२७ क्विंटल आवक झाले. या मिरचीला सरासरी दर २६०० रुपये क्विंटलपर्यंत होता.  

मुंबई बाजारसमितीतील शेतीमालाची आवक व दर सोमवार (ता.१८) (क्विंटल/रुपये)
शेतमाल आवक किमान कमाल सरासरी
भुईमूग शेंगा   २३५ ३००० ४००० ३५००
भेंडी ४८९  २४००  २६०० २५००
फ्लॉवर २३२१  १४०० १६०० १५००
गवार २६४ ३००० ४००० ३५००
वांगी ५१५ १८०० २०००  १९००
वाटाणा २७० ५००० ७००० ६०००
डाळिंब ८८८   ७७०० ७९०० ७८००
मोसंबी १७१० १६०० २९०० २२५०
पपई १०६५  १७५० ३००० २३७५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com