परभणीत ढोबळी मिरची १२०० ते १८०० रुपये क्विंटल

ढोबळी मिरची
ढोबळी मिरची
परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. १६) ढोबळी मिरचीची १० क्विंटल आवक झाली. ढोबळी मिरचीला १२०० ते १८०० रुपये क्विंटल असे दर मिळाल्याची माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.
 
पालेभाज्यांमध्ये पालकाची २५ क्विंटल आवक झाली. पालकाला ३०० ते ५०० रुपये क्विंटल दर मिळाले. चुक्याची ७ क्विंटल आवक झाली. चुक्याला ५०० ते ८०० रुपये क्विंटल दर मिळाले. मेथीच्या १५ हजार जुड्या आवक झाली. मेथीला १५० ते २५० रुपये शेकडा दर मिळाले. शेपूची ८ क्विंटल आवक झाली. शेपूला १००० ते १५०० रुपये क्विंटल दर मिळाले. कोथिंबिरीची ८० क्विंटल आवक झाली. कोथिंबिरीला ४०० ते ८०० रुपये क्विंटल दर मिळाले.
 
शेंगवर्गीय भाज्यांमध्ये गवारीची ४ क्विंटल आवक झाली. गवारीला ३००० ते ४००० रुपये क्विंटल दर मिळाले. चवळीची २ क्विंटल आवक होऊन २००० ते ३००० रुपये क्विंटल दर मिळाले. वालाची ८ क्विंटल आवक झाली. वालास १००० ते १५०० रुपये क्विंटल दर मिळाले. शेवग्याची २५ क्विंटल आवक झाली. शेवग्याला ५०० ते ८०० रुपये क्विंटल दर मिळाले.
 
वांग्याची ६० क्विंटल आवक झाली. ४०० ते ७०० रुपये क्विंटल दर मिळाले. टोमॅटोची ८०० क्विंटल आवक झाली. टोमॅटोला २०० ते ३०० रुपये क्विंटल दर मिळाले. हिरव्या मिरचीची ३५ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला २००० ते २५००  रुपये क्विंटल दर मिळाले. भेंडीची १५ क्विंटल आवक झाली. भेंडीला ८०० ते १५०० रुपये क्विंटल दर मिळाले.
 
फ्लाॅवरची ३५ क्विंटल आवक झाली. फ्लॉवरला ३०० ते ५०० रुपये क्विंटल दर मिळाले. कोबीची ३५ क्विंटल आवक झाली. कोबीला ३०० ते ४०० रुपये क्विंटल दर मिळाले. दोडक्याची ५ क्विंटल आवक झाली. दोडक्याला २००० ते ३००० रुपये क्विंटल दर मिळाले. कारल्याची १० क्विंटल आवक झाली. कारल्यास १५०० ते २५०० रुपये क्विंटल दर मिळाले. काकडीची ३० क्विंटल आवक झाली. काकडीला ४०० ते ८०० रुपये क्विंटल दर मिळाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com